Saturday, 4 August 2012

मलाही girl friend मिळावी...

मलाही girl friend मिळावी...!

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी...!

1 comment:

  1. प्रेयसी,
    तु माझी प्रेयसी.
    होशील का?
    तु माझी प्रेयसी.

    तुझ्या सौंदर्याने👩‍🦰 वेडा मी झालो,
    अलगत मी प्रेमात 😍पडलो.
    तुझ्या स्वभावाने केली जादू अशी,
    प्रेयसी ,
    तु माझी प्रेयसी,
    होशील का?
    तु माझी प्रेयसी.

    कसे समजाऊ तुला ?
    फार आवडते💗 तु मला.
    बघतो रोज 🤩तुझ्याकडे,
    बघ एकदा 😘माझ्याकडे,
    राहु नकोस आता आळशी,
    प्रेयसी,
    तु माझी प्रेयसी.
    होशील का ?
    तु माझी प्रेयसी.


    तुझे माझे नाते आहे जन्माचे,
    अर्थ तुला कळत नाहीत शब्दांचे.
    तु नाहीस मिळाली तर घेईल मी 😷फाशी!
    प्रेयसी?
    तु माझी प्रेयसी.
    होशील का?
    तु माझी प्रेयसी.



    घेऊ नकोस तु फाशी,
    झाले मी तूझी 🧚‍♀️प्रेयसी.
    मिठीत घे मला 🏋️‍♀️लवकर,
    प्रियकर,
    तु माझा😎 प्रियकर,
    झालास तु, माझा प्रियकर.

    प्रेयसी,
    तु माझी प्रेयसी,
    झालीस तु,
    माझी प्रेयसी. संकेत रणखांब

    ReplyDelete

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...