Showing posts with label तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.. Show all posts
Showing posts with label तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.. Show all posts

Monday, 28 May 2012

तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.


पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...