Showing posts with label एम.बी.बी.एस आहे.. Show all posts
Showing posts with label एम.बी.बी.एस आहे.. Show all posts

Monday, 28 May 2012

प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

 प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

तिला म्हणालो, मला आजकाल झोप येत नाही
काय करु , तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली
झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो , माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली ,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे .
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो , तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्याक्षणी ती उठली, आणि आत निघून गेली .
माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स" घेवून आली.
..... मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे.
अहो ! प्रेयसी माझी, एम .बी.बी.एस आहे.

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...