तुझी वाट बघता बघता …
रस्ता तेवढा संपला,
तू तर आलीच नाहीस …
पण अपघात मात्र घडला…
यायचंच नव्हत तुला …
हे मी समजून घ्यायला हवं होतं,
वेळ नसल्याचा तूझं कारण …
मला genuine वाटलं होतं…
तू सोबत असतीस ,
तर मला माझ्याही आधाराची गरज नव्हती,
तू फक्त सोबत असावी ,
एवढीच माझी इच्छा होती …
मी तुझी वेड्यासारखी वाट पाहत होतो…
हे मला आत्ता पटलं ,
तुला मात्र अजूनही …
माझं मन नाही कळलं …
वाट पाहून तुझी …
मला वाटतं आत्ता काही उपयोग नाही ….
पण या मनाला कोण समजावत बसणार …
ते माझं ऐकतच नाही ….
गरज म्हणून'नातं'कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं'म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक'नातं'जप.. मध्येच माघार घेऊ नकोस
No comments:
Post a Comment