Thursday, 21 June 2012

श्वास धरणीचा कोंडला...

श्वास धरणीचा कोंडला...

श्वास धरणीचा कोंडला,
जाउ लागले तडे
पाण्याच्या थेंबासाठी
जीव माणसाचा जळे!

रक्त आले डोळी
पाय आता लटपटे
माउलीच्या डोईवर
का रिकामेच घडे?

काळ्या भुईत अडला,
जीव कोणाचा खोल
नांगराच्या फाळ्यातुन
वाहे  रुधिर कोमल!

आकाशी आले विमान
तुका बैसीला देहाविन,
बोला आता पांडुरंग
जय हरी पांडुरंग!!

पिडीत सुनेची एकंच कथा...


पिडीत सुनेची एकंच कथा...

पिडीत सुनेची एकंच कथा
ती म्हणजे जुन्या रीतीची नवीन प्रथा

आज कालच्या पित्याचा पण बनलाय एकंच फंडा
मुलाचा जन्म म्हणजे सोन्याचा अंडा
मुलगी जन्मली कि द्यवा लागतो हुंडा

सोन्याच्या चेन साठी सासूचा छळ
घरी मागताना होई सुनेच्या हृदयात कळ

एव्हड पण येत नाही तिच्यात बळ
कि ह्या नरकातून काढावा लवकर पळ

पण इथे पण तिच्या हृदयाला कळ..
माय-बापाच्या अब्रूला लागेल मळ

मग कुण्या बाळाची आई होणारी ती सून.
अंगावर घेते सर्व दुख ओढून
आणि जाते ह्या निर्दयी जगाला सोडून..

ह्याच त्या यातना ..आणि हीच ती कथा
आणि यालाच म्हणतात जुन्या रीतीची, नवीन प्रथा ..

कसली ग तुला चिंता....

कसली ग  तुला चिंता....

नवरा बेवडा मिळायची
कि प्रियकर सोबत पळून जायची.
आई-वडलांच्या अब्रू ची
का लग्नासाठी लागणाऱ्या हुंड्याची..

कसली ग तुला चिंता..
रात्री ची तुझी झोप उडाली
कारण तूच त्याच्या प्रेमात बुडाली
त्याला नाही ग बाई तुझी चिंता.

मग होवूदेन प्रेमाची चिता
मनाच्या भावनांमध्ये तूच तरंग्तेस
आणि अर्धवट स्वप्नांना तूच रंगवतेस..

कश्यासाठी हे तू करतेस..
आणि कुणासाठी तू झुरतेस..
संग न कसली ग तुला चिंता
कसली ग तुला चिंता...

साधी भोळी दिसणारी तू..
खूप सुंदर हसायचीस
आणि रडताना पण शोभून दिसायचीस..

मग का
खऱ्या सौंदर्याच हरवून भान..
तूच केलास तुझ्या रुपाला घाण..
आणि तेच तुला वाटतंय पण छान
आणि तरी पण तुला सुंदर दिसायची चिंता..

कसली ग तुला चिंता ..
आत्ताच सावरून घे बर
नाहीतर होवून जाईल
चिंता ता ता  चिता चिता चिंता ता ता.....

हरवलेली माणुसकी....

हरवलेली माणुसकी....

कुलदीपकच हवा, शुध्द अंधविश्वास.
मुलीचा गर्भ पोहचे,पार गटार गंगेस.
निसर्गाचा समतोल पार बिघडून जाई.
पुरुषाचा स्त्रीवाचून जन्मच वाया जाई.

भ्रष्ट आचार आता नित्य नेम झाला.
अंध वासनांच्या त्या उफाळती ज्वाला.
कधी बळी जाते बिचारी अबला नार.
तर कधी होरपळे ते बाल्य सुकुमार.

संपत्तीचाच हव्यास भर-भरून राही.
भावाची ओळख आता भावास नाही.
अविचार , स्वार्थाने भिनली जमात.
माता-पित्यास सोडती दूर वृद्धाश्रमात.

नीती मूल्यांचा होई र्‍हासच जणू हा.
सभोवर जनावरांचा भासच जणू हा.
प्रकृतीचे हे दुष्ट स्वप्न विरून जावे.
मनुष्यास माणुसकीचे आता भान यावे.

Thursday, 14 June 2012

असं म्हणण्यात काय अर्थ आहे?

जीवनरूपी झऱ्यातलं पाणी
झिरपत झिरपत जाऊन कालांतराने कमी होतं
असं म्हणण्यात काय अर्थ आहे ?
या झिरपणाऱ्या पाण्यामुळेच रुजवलेलं पीक 'सुपीक' होतं

असं समजायला काय हरकत आहे?
आपल्या नशिबात हे नाहीच
असं म्हणून निराशा पदरी पडून घेण्यात काय अर्थ आहे?

  - आकाशाकडे बघत चाललो होतो म्हणून ठेच लागून पडलो
असं समजायला काय हरकत आहे?
आम्ही तुमच्यासारखे 'अमुक' असतो
तर 'तमुक' करून दाखवले असते
असं म्हणण्यात काय अर्थ आहे?

- आपण तसे ''अमुक'' नव्हतो म्हणूनच
आपल्या जीवनातली ''चुकामुक'' टळली
असं समजायला काय हरकत आहे?

आयुष्य म्हणजे खेळ डोम्बार्याचा



आयुष्य म्हणजे खेळ डोम्बार्याचा......



आयुष्य म्हणजे खेळ डोम्बार्याचा
पोटासाठी मैलोनमैल फिरायाचा
अंगी कमावलेले कौशल्य दाखवण्याचा
त्याचं उमेदीनं पुढे पुढे चालण्याचा

आयुष्य म्हणजे खेळ कुंभाराचा
जीवनाच्या मातीत संस्कार ओतायचा
बनलेल्या चिखलाचा माणूस घडवायचा
अस्सल मडकीच निवडण्याचा
खोटारडी मातीमोल होण्याचा

आयुष्य म्हणजे खेळ चुलीवरचा
भाकर भाजता भाजता हात भाजण्याचा
विस्तव फुकता फुकता डोळे पाणावण्याचा
गिळून भाकर तृप्त होण्याचा
अन् पुन्हा पोटासाठी धडपड करण्याचा

आता सर्व काही आठवेल तुला....

आता सर्व काही आठवेल तुला....
आता सर्व काही आठवेल तुला....

अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही      
 प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता

याची परतफेड करशील..
 मान खाली घालशील शरमेने..

खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..

    कीनारी पोहोचवशील
 पाचव्या ईसमाच्या मदतीने..

हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला

    माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल

नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे

    तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील

उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील

    देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही....माझा आणि तुझाही...

    - तुझी प्रेमस्वरुप आई

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...