आयुष्य म्हणजे खेळ डोम्बार्याचा......
आयुष्य म्हणजे खेळ डोम्बार्याचा
पोटासाठी मैलोनमैल फिरायाचा
अंगी कमावलेले कौशल्य दाखवण्याचा
त्याचं उमेदीनं पुढे पुढे चालण्याचा
आयुष्य म्हणजे खेळ कुंभाराचा
जीवनाच्या मातीत संस्कार ओतायचा
बनलेल्या चिखलाचा माणूस घडवायचा
अस्सल मडकीच निवडण्याचा
खोटारडी मातीमोल होण्याचा
आयुष्य म्हणजे खेळ चुलीवरचा
भाकर भाजता भाजता हात भाजण्याचा
विस्तव फुकता फुकता डोळे पाणावण्याचा
गिळून भाकर तृप्त होण्याचा
अन् पुन्हा पोटासाठी धडपड करण्याचा
No comments:
Post a Comment