Monday, 28 May 2012

मैत्री : एक शोध

मैत्री : एक शोध

जेंव्हा जीवाचं शिवाला
रंकाचं रावाला
भक्ताचं देवाला
न सांगताही कळलं जातं
तेंव्हाच आपोआप
मैत्रीचं नातं जुळलं जातं

मैत्री मैत्री असते
मैत्री जन्मदात्री असते
मैत्री म्हणजे खात्री असते
मैत्री म्हणजे पत्रापत्री असते
मैत्री म्हणजे
कधी तीची,कधी त्याची
भर पावसात,
उन्हाळ्याच्या दिवसात
दोघांत
फक्त एकच छत्री असते

मैत्री म्हणजे लुकलुकणारं चांदणं
मैत्री म्हणजे हातावरचं गोंदणं
मैत्री म्हणजे मना-मनातल्या
तणाचं वेळोवेळी निंदणं
मैत्री म्हणजे
एकमेकांच्या कुशीत स्फुंदनं

मैत्री रडवते
मैत्री हसवते
मैत्री सांगुन फसवते
मैत्री मना-मनात नवा स्वर्ग वसवते

मैत्री विहिरीतला पारवा
मैत्री रानातला सरवा
मैत्री उन्हातला गारवा
मैत्री मिसळीतला झणझणीत शरवा

राधेचा संग असते मैत्री
मीरेचा रंग असते मैत्री
द्रौपदीचे न उलगडलेले
गुढ अंग असते मैत्री
सुदाम्याच्या किड्क्या पोह्या्त
कधी गुंग असते मैत्री
कधी कर्ण दुर्योधनाच्या
प्रेमात दंग असते मैत्री

मैत्री क्षणभर टेकायला हक्काचं स्थळ देते
मैत्री लागेल एवढी कळ देते
मैत्री जगायला आभाळाएवढं बळ देते !


जगण्यासाठी अजुन काय हवं

जगण्यासाठी अजुन काय हवं

एक आई, एक बाप,
एक भाऊ, एक बहिण,
असं एखादं घर हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक मित्र, एक शत्रु,
एक सुख, एक दु़:ख,
असं साधं जीवन
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,
एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,
यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक सुर्य, एक चंद्र,
एक दिवस, एक रात्र,
फक्त सगळं समजायला हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक शक्ती, एक भक्ती,
एक सुड, एक आसक्ती
ठायी असेल युक्ती तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

थोडा पैसा, थोडी हाव,
थोडा थाट, थोडाबडेजाव,
सगळयांच्या तोडी आपलंच नाव,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक नोकरी, एक छोकरी,
दोन मुलं अन खायला भाकरी,
उत्तम प्रकारची जर असेल चाकरी,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक समुद्र, एक नदी,
एक शांत, एक अवखळ
जीवनात असली जर एक तळमळ
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक इच्छा, एक आशा,
एक मागणं, अक अभिलाषा,
मनात भरलेली सदा नशा,
जगण्यासाठी अजुन काय हवं

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास

कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास

आठवण आली तुझी की.

आठवण आली तुझी की,

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..

मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं

मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं

अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य…
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…

पण तरिही………

आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….

नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी….

कोणीतरी असाव....

कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर...
फक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...
सांत्वन नाही केल जरी कोणी ...
तरी त्याच ते दुख: खर असाव...

उद्या मी मेल्यावर...
सगळ इथेच असणार आहे...
पण माझ्या फोटो कड़े पाहून...
ओठावर हसू आणि डोळ्यात वेदना ठेवणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
विसरले जरी सगले तरीही....
माझी आठवण ठेवून श्वास घेणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
माझ्या आठवणीत जागुन रात्र काढणार...
माझ्या फक्त माझ्या कुशीत शिरण्यासाठी तळमळणार कुणीतरी असाव...

वाढदिवसांची वाढ

वाढदिवसांची वाढ

वाढदिवस साजरे केल्याशिवाय
जणु नेते, नेते वाटत नाहीत.
बारशापासून शताब्दीपर्यंत
कुठलेच महोत्सव सुटत नाहीत.

नेत्यांच्या वाढदिवसाला
कार्यकर्त्यांचेच थाट असतात.
लेकराबाळांचे नसले तरी
नेत्यांचे वाढदिवस पाठ असतात.

अमके दान, तमके दान,
कार्यक्रमांची दाणादान असते.
पक्षीय मतभेद विसरल्याची
ऍक्टींग पण फार छान असते.

नेत्यांचे वाढदिवस,
नेत्यांना लखलाभ होवोत !
" तुम जिओ हजारों साल "
पण जनतेच्या नशिबी,
सुखाचे चार दिवस येवोत !!

जय भवानी जय शिवाजी

"जय भवानी जय शिवाजी"

माझे अवघे मी पण हिंदू
आयुष्याचा कणकण हिंदू,
ह्रदयामधले स्पंदन हिंदू
तन-मन हिंदू, जीवन हिंदू !

धगधगणारी मशाल हिंदू
आकाशाहुन विशाल हिंदू,
सागरापरी अफाट हिंदू
हिमालयाहुन विराट हिंदू !

तलवारीचे पाते हिंदू
माणुसकीचे नाते हिंदू,
अन्यायावर प्रहार हिंदू
मानवतेचा विचार हिंदू !

महिला, बालक, जवान हिंदू
खेड्यामधला किसान हिंदू,
शहरांमधुनी फिरतो हिंदू
हरेक मस्जिद, मंदिर हिंदू !

झंझावाती वादळ हिंदू
हिंदू हिंदू केवळ हिंदू !

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...