Tuesday, 29 May 2012

प्रेम केल होत ग तुझ्यावर ...........

प्रेम केल होत ग तुझ्यावर ...........!

खुप प्रेम केल होत ग तुझ्यावर
पण नाही सांगु शकलो मी तुला,
कदाचित नाही म्‍हणाली असती
याची भिती वाटत होती मला.

कॉलेजमध्‍ये पहील्‍याचदिवशी तु
माझ्याकडे बघुन लाजुन हसली होतीस,
बस त्‍याच क्षणापासुन तु
मला आवडली होतीस,

तुझ लंक्ष नसतांना
तुझ्याचकडे पहात बसायचो,
तुने बघीतल्‍यावर मात्र
नजर चोरायचो.

तु येण्‍याच्‍या वेळेस
वर्गाच्‍या दरवाज्‍यात उभा रहायचो,
आणि तु आल्‍यावर मी
मुद्दामच तुला चिडवायचो.

एक वेळेस माझ्याकडुन
तुझा ड्रेसही खराब झाला,
पण अस वागण्‍याचा तुला माझा
कधीच राग नाही आला.

तुझ्याशी बोलतांना वाटल
तुलाही माझ्याशी प्रेम झाल,
म्‍हणुन आदल्‍याच दिवशी
मित्रांना चोरुन तुझ्यासाठी गुलाब आणल.

गुलाब देण्‍याअगोदर
मनात प्रश्‍न उठले असे काही,
तुझा माझ्याकडे बघण्‍याचा फक्‍त
मैत्रीचा दृष्‍टीकोणतर नाही.

मग काय.....
आणलेल्‍या फुलाकडे
दुःखी मनाने पाहीले,
उचलुन त्‍या गुलाबाला
पुस्‍तकात ठेवले.

शेवटी....
शेवटी तो कॉलेजचा
शेवटचा दिवस आला,
तुला माझ्यापासून कायमचे दूर घेऊन गेला.

त्‍या दिवशी तुझ्या डोळ्यातही
पाणी आले होते,
माझ्यावरचे प्रेम मि
नकळत तुझ्या डोळ्यात पाहीले होते.

आज तुझ्यापासून दुर व्‍हायला
मोजुन दीड वर्ष होण्‍यात आले,
पण असे वाटते हे सर्व...
काल परवाज घडाले.

कदाचीत...
कदाचीत तुही माझी
आठवण काढत असशील,
आणि माझ्या आठवणीत
अश्रृ गाळत बसशील.

आज मी दीड वर्षांनी ते
पुस्‍तकातले सुकलेले गुलाब पाहतो हे,
आणि पाहतांना त्‍या गुलाबावर
अश्रृंचा अभिशेक करतो हे.

या भित्र्या मनाला आज
खुप कोसतो हे,
मि आज पुन्‍हा तुझी
माफी मागतो हे.

माफ कर मला....
नाही सांगु शकलो मी तुला,
भिती वाटत होती त्‍या
एका "नाही" ची मला.

कस सांगीतल असत ग तुला,
मैत्रीचा प्रश्‍न
पडला होता मला.

होईल तर माफ कर
खरच....
खुप प्रेम केल होत ग तुझ्यावर
पण नाही सांगु शकलो मी तुला,
कदाचित नाही म्‍हणाली असती
याची भिती वाटत होती मला...........

No comments:

Post a Comment

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...