Monday, 28 May 2012

“….चिंब भिजलेलं पत्र….”

“….चिंब भिजलेलं पत्र….”


आली पावसाची सर
धावत पडली झरझर
भिजल्या पाकिटातून पत्र
डोकावू लागलं वर

चिंब चिंब भिजलं
अगदी शब्द ओघळेपर्यंत
तरी थोडं उरलं पुसटसं
आठवणी जुळवेपर्यंत

समोर बसून तिनं ते
लिहिलं होतं तिच्या हातानं
चार घड्या पडल्या तरी
जवळ असायचं तिच्या रुपानं

ओघळली सगळी शाई
गेली त्या सरीत वाहून
आत्ता कशी आठवण काढू
आणि कोणाकडे पाहून..??

तसचं ते पाकिटात ठेवीन
कितीही घड्या पडल्या तरी
झाला जरी कागद कोरा
त्यातच माझी स्वप्नातील परी


No comments:

Post a Comment

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...