Sunday, 24 June 2012

खरं प्रेम करणाऱ्‍यांसाठी...

खरं प्रेम करणाऱ्‍यांसाठी एक सुंदर वाक्य:

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते, 
तिच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!असंही प्रेम असतं!!

अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....
काय करु?
काहीच सुचतं नव्हतं...

उगाच मनात विचार आला,
चल स्मशानात जाऊयात....

गेलो मग स्मशानात एकटाच!
बसलो एका थडग्याजवळ जाऊन.... थडगे ताजे वाटत होते....

मनात कुतूहल जागले....
थडग्यावरचे नाव वाचले...'
महनाज़ खान ' '१९८६-२००७'... म्हणजे माझ्याच वयाची असेल!

कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?
काय कारण असेल?
आजार?
खून?
का...
का बाळंतपणात दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...

तेव्हढ्यात

एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....
मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'

तो म्हणाला 'नाही,
मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'

मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'

तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय!
२ आठवडे उरले आहेत फक्त!'

मी चकीत झालो!
विचारले ' मग तिने आत्महत्या का केली?
तू जिवंत असतानाही?'

तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे.

जीवनाची शैली जाणली आहे का कोणी...

तात्पुरत्या समस्यांसाठी घेतलेला कायमचा पर्याय...
नाव घेताच गोष्टीचे फिरतात आपोआपच पाय..

जीवनाची शैली जाणली आहे का कोणी .....?
तो, ती किंवा ते याचा मालक तरी कोण.......?

काय चुकल ? या निसर्गमय जीवनाकडून कोणाचे
नका घालू हातकडी जे आहे दुसऱ्याचे

का उचलतात लोक असले पाऊल ?
जीवनाला मरणाची लागते चाहूल

प्रसंगाला सामोरे जायचे भान उरत नाही
कारण तुमच्या डोक्यातच काही शिरत नाही

असे पाऊल उचलण्याची पूर्वी नव्हती प्रथा 
ते लोक सहजच सहन करायचे अशा  व्यथा 

तुम्हीच आहात तुमच्या घराण्याचा चिराग
मग आज या फुलावरील कुठे गेले पराग ?

नका करू असा विचार नका करू प्रवृत्त
या वेदना सहजच छापतात मग वृत्तपत्र

तुकारामांची गाथा, समर्थांचे श्लोक ,वाचायचे कोणी..?
आम्हाला दिसतात ,आमचेच tension अन आमचीच रडगाणी

सोडून द्या नकारात्मक विचार
पहा जरा डोळे उघडून
कोणीतरी नक्कीच फिरवेल हात
तुमच्या खचलेल्या पाठीवरून 

कोणीतरी नक्कीच फिरवेल हात
तुमच्या खचलेल्या पाठीवरून   ........ :)

मी मराठा, मी मराठा, जगतो, लढतो मराठा...


मी मराठा, मी मराठा, जगतो, लढतो मराठा,
धुळ चारुन गनिमास, पुरुनी असा उरतो मराठा,
मायभूमी धन्य ती, जन्मला एक थोर मराठा,
स्वराज्याचे तोरण बांधुन, नडला तो एक मराठा . . .

हिंदवी स्वराज्य तो, तळपतो, तडपतो,
गुलामीची साख तोडून, एक मराठा लढतो,
काय थोरवी गावी त्यांची, मनी प्रश्न दाटतो,
रयतेचा राजा माझा, अजुनही हवासा वाटतो . . .

थोर असा माझा राजा, ख्याती उभ्या जगात,
आजही जिवंत आहे, आमच्या तनात, मनात,
मराठीचा मान त्या मराठ्यानं मिळवला,
झुकवुन असे गनिमास, हिंदवी स्वराज्य घडविला . . .

स्पृश्य आणि अस्पृश्य न भेद तू मानला,
मी रयतेचा आणि रयत माझी, धर्म मराठी आणला,
जाण ठेवून मनी, इतिहास तुझा वाचिला,
गर्वच नाही तर माज मराठी असल्याचा मग वाटला . . .

नमन करत तुला आशि॔वाद मागतो आहे,
मी मराठा, मी मराठा करत फ़क्त मराठी जगतो आहे . . .

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर...

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती  कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर


करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमिनीवरती  कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढुन देताना
संकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर


करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

आहेत क्षण हे अपुरे...

आहेत क्षण हे अपुरे,
नाही लाभणार आयुष्य दुसरे.
फैलावून दे पंख भरारीचे,
तोडूनी बंधने, जग आयुष्य एकदाचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...

जग आयुष्य तू, ते उन , ती सावली, त्या पावसाचे,
जग तू वाट, सुखाची अन दुखाची, मैत्र पावलाचे.
जग तू आयुष्य, दात्या वृक्षाचे,   
आयुष्यात कर्म फक्त परोपकाराचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...

जग तू आयुष्य, झुळझुळ झऱ्याचे,
खडतर प्रवासात, गीत गात वहायचे.
जग तू आयुष्य, गरुडझेपिचे ,
तोडून बंधने सारी आसमंत चुमण्याचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...

जग तू आयुष्य, तेवणाऱ्या दीपकाचे,
अंधारात वाट दाखवणाऱ्या, मार्गदर्शकाचे.
जग तू आयुष्य, त्या नाती, त्या मैत्री, त्या प्रीतीचे,
देवू नकोस  कोणा हृदया अबोलपण तुझ्या मनाचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...

जग तू आयुष्य, थोर माणसाचे,
माणुसकी जपणाऱ्या मानवाचे.
जग तू असे काही, मनांत ना काही राहायचे,
काळाच्या पडद्यावर ओळख करून जायचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...

जग तू आयुष्य, असे काही क्षणांचे,
काळाच्या मंचाने तुझे गीत गायाचे.
काळाच्या पडद्यावर, तुझी कीर्ती कोरण्याचे, 
असुनी पडद्याआड, पण पडद्यावर चिरंजीव राहण्याचे.
काळाच्या पडद्याआड, एक दिवस जायचे...

Thursday, 21 June 2012

लव लेटर...

नाक्यावरच्या पिंटूच एकदा,
सोसायटीतल्या पिंकिवर प्रेम जडल,
लव लेटर लिहून दे ,
मित्रांनी पिंटूला फूल उचकवल.

पिंटून लिहिल लव लेटर,
रात्र रात्र जागुन जागुन ,
चंद्र चांदण्या डार्लिंग जानू ,
भरल त्याचात कोम्बुन कोम्बुन.

गाडीवरती ट्रिपल सीट बसून,
रात्रि पिंटू सोसायटीत आला ,
घाबरू नको पिंटू म्हणुन ,
मित्रांनी त्याला धीर दिला .

दगडाला लपेटून लेटर ,
पिंकिंच्या खोलीकडे भिरकावल,
खिड़की फुटायचा आवाज आला ,
लेटर तसच हातात राहील.

कोण आहे रे तिकडे म्हणुन ,
पिंकिच्या आईने दार उघडले ,
पिंटूला तिथच सोडून देऊन ,
मित्र त्याचाच गाडीवरून पळाले.

चोर चोर चोर ओरडत ,
पिंकिच्या आईने केला कल्ला ,
पळता पळता पायाला पिंटूच्या,
गल्लीचा कुत्रा कचकन चावला .

पिंकिचा होकार तर दुरच ,
पण १४ इंजेक्शन घ्यावे लागले,
पिंटूचे हे प्रेम प्रकरण,
चांगलेच त्याच्या अंगावर आले .

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?


समजून सगळे

नासमज बनतात मुली

चांगल्या चांगल्या मुलांना

वेडयात काढतात या मुली

अनोलखी पुरुषाला

दादा - भैय्या म्हणतात या मुली ,

पण आपल्याच वडलान्ना

काका का म्हणतात या मुली ,

बोलायला गेलो तर

लाइन मारतोय म्हणतात या मुली,

मग नाहीच बोललो की

शाइन मारतोय का म्हणतात या मुली?

मुद्द्याच बोलण थोड़च असत

तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,

जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....

तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?

पावसात भिजायच तर असत

तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?

थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!

मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??

वाचून ही कविता

चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!

मग (कदाचित) विचार करून मनात...

थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...

आता तरी facebook बाबा पावशील का.....


( मित्रानो माझ्यासारख्या सगळ्या facebook वेड्यांसाठी, माझी एक नविन कलाकारी... खालील गाण्याला चाल लावली आहे " आता तरी देवा मला पावशील का" ह्या गाण्याची... मी आशा करतो की हे गाने तुम्हाला नक्की आवडेल.... आणि आपण मला आपली प्रतिक्रिया देखिल दयाल...)


आता तरी facebook बाबा पावशील का....
पोरिगी मला पटवून... देशील का.... हो हो हो.... आता तरी facebook बाबा पावशील का .....

दिलेस उघडून मला अकाउंट... तरी,
chating मला करायची आहे खरी,
छान छान request मला पाठवशील  का..... पोरगी मला पटवून देशील का... हो हो हो...
आता तरी facebook बाबा पावशील का 
पोरगी मला पटवून देशील का.....

दिसता नविन मुलगी facebook वरी,
जिव माझा असा हा तळमळ करी,
request accept करायला सांगशील का..... पोरगी मला पटवून देशील का... हो हो हो...
आता तरी facebook बाबा पावशील का 
पोरगी मला पटवून देशील का.....

जुने मित्र जरी भेटले.... हरी,
मैत्री त्यांची टिकवायची आहे खरी,
आठवणिना उजाळl तू देशील का..... पोरगी मला पटवून देशील का... हो हो हो...
आता तरी facebook बाबा पावशील का 
पोरगी मला पटवून देशील का..... 

पटली पोरगी मला facebook वरी,
guarantee नाही तिची ती आहे गोरी,
शेवट पर्यंत साथ द्यायला सांगशील का..... पोरगी मला पटवून देशील का... हो हो हो...
आता तरी facebook बाबा पावशील का 
पोरगी मला पटवून देशील का..... 

पोरगी मला पटवून देशील का..... हो हो हो... पोरगी मला पटवून देशील का..... 

no more tears..

बस करो यार
अब no more tears
लढना बिछडना
no more fears
खुप झालं मागे झुरणं बिरणं
आधं अधुरं जगणं मरणं
यायचं असेल.. चल ये
नसेल.. double बेल दे
कुठे आठवण काढत बसता
झिजलं नशीब, झिजवत बसता
तिच्या मनात सुद्धा तुम्ही नसता
सोड नाद, चल गाडी बदलू
मुंबई नाहीतर परळ पकडू
final  स्टेशन एकच ठरवू
मुखडा तेवढा हसत मिरवू
Be happy go lucky  8)

facebook वरच प्रेम जरा वेगळच असतं

त्याच original वा तीच dummy account असतं
good morning, good night सदा online असतं.

तिच्या प्रत्येक status ला याच like असतं
याच्या प्रत्येक photot तीच tag असतं.

एकमेकान एकमेकाच profile पाहन चालूच असतं
कोणत्याही notification वर like /comment चालूच असतं.

कारण नसताना उगाच "hi ...hi " चालू  असतं
काही मोजके महिने दोघांच हिरवं signal चालू असतं     

मग कोणालातरी नवीन friend request आलेलं असतं
इकडच chatting विसरून तिकडे video calling सुरु झालेलं असतं

इकडच्या profile ला ते उमजायला लागतं
मनाच्या क्रोधाला  मग block the person शिवाय option नसतं ...option  नसतं.

facebook  वरच प्रेम जरा वेगळच असतं.

नजरेचे SMS

नखरेल इम्पोर्टेड smile तुझ,
मॉडर्न आर्ट सारख वाटल,
सांगायच असेल एक तुला ,
मला भलतच काहीतरी वाटल .

नेहमीच तुझा तो भड़क make-up,
माझा पण नुकताच झालेला break-up,
तुझ त्या hi-fi अदांनी,
मूड माझा झाला wake-up.

मित्र म्हणतात तू STD-ISD,
पण local च परवडतो मला,
म्हणुन आता मी दुरूनच ,
नजरेचे SMS पाठवतो तुला .

एक आठवण तुझी...

एक आठवण तुझी !


तू माझी राणी
माझ्या मनाला भावली
मला जगण्यासाठी
हवी रोज तुझी सावली


तू जर नसती भेटली
तर झालो असतो मी आवली
पण तू माझी झाली
अन् जणू आई आंबाच पावली


तुझ्या घरी आलो
तेंव्हा तुझी कुत्री चावली
पुन्हा चावायला आली
तेंव्हा जोरात एक लाथ घातली


मग घरात प्रवेश होताच
तुझी बहिण मला भेटली
ओह! याना आत म्हणत
मस्त गोड हसली


बसा बसा म्हणत
माझ्या जवळ येऊन ती बसली
मला वाटलं तुझ्या ऐवजी
तुझी बहीणच पटली


तितक्यात घरात अचानकपने
तू आत शिरली
माझ्या हातातलं पुस्तक
घेऊन बहिणीवर ओरडली


ती हि राग रागने
बेडरूम मध्ये कडमडली
अन् मला घराबाहेर काढून
तू मोठ मोठ्याने बडबडली


"माझ्या बहिणीवर डोळा "..........

वात्रट उखाण्याची कविता...

 टिम्ब टिम्ब रावांच्या सोबत राहुन,
 करणार आहे मी धमाल,
 न मागताच देवाने दिलाय,
 मला फुकटचा हमाल.
मी कान्जिवरमची महागडी साडी,
 तो स्वस्ताचा matching रुमाल,
 न मागताच देवाने दिलाय,
 मला फुकटचा हमाल.
मी हैरी पॉटर मधली हरमाइनि,
 तो स्लम डॉग मधला जमाल,
 न मागताच देवाने दिलाय,
 मला फुकटचा हमाल.

अभ्यास जरा जास्त आहे, दरवर्षी वाटत,

अभ्यास जरा जास्त आहे, दरवर्षी वाटत,
दरवर्षी syllabus घेऊन, semester मनात दाटत..
तरी lectures करन चालु राहत bunking चालत नाही,
common off शिवाय मनामध्ये कोणीच बोलत नाही.....

तितक्यात कूठून एक सुट्टी time table मध्ये येते,
अभ्यासातला काही भाग पंखाखाली घेते,
syllabus पेट्रोलसारखा संपत राहतो,
मन, बुद्धी, आनंदावरती - career वरती जळू लागतो,
college संपून सुट्ट्यांचा पुन्हा सुरु होतो खेळ,
अभ्यासामागून चालत येते मौजमजेची वेळ,
चक्क डोळ्यासमोर semester syllabus बदलून घेतो,
सुट्ट्यांमध्येही college मध्ये कुठून professor येतो....!!!

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी.......

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी.......

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली

सकाळी सकाळी गेलो म्या बस थांब्या वरती
सुंदर सुंदर पोरयाईची असते जिथे भरती

इकत घेतला होता गुलाब लाल चुटूक छान
मिथुन वानि दिसत व्हतं म्हाय एकूण ध्यान

लाल प्याटं हिरवा शर्ट गॉगल व्हता लावला
मले होता व्हॅलेंटाईन डे चा कीडा चावला

जाउन उभा राहिलो म्या जवळ एका पोरीच्या
सुंदर अश्या दिसणार्‍या त्या बघा गोरीच्या

दिलाची हो माझ्या अशी वाढली होती धक धक
बघत होतो तिच्या कडे सारखा म्या टक मक

पोरी बघून बाकी म्हाइ टर होत्या उडवत
बघतोय बघ तुलेच बोलून तिला होत्या चिडवत

म्हन्ल एवढी सुंदर हाय पटली तर नसल
बघुया चान्स मारून नेमच तर चुकल

कसा तरी आव आनुन म्हनलं तिले हल्लो
हाय तिने म्हणताच म्या उभ्या उभ्या मेलो

गुलाब देऊन म्हन्ल खूप प्रेम करीन तुझ्यावर
दिवस आज हाय प्रेमाचा नको नेऊस उदयावर

तिनं बी मग कबूल हाय म्हन्लं थोड लाजुन
इस्वास नाही बसत मले खरं सांगतो आजुन

मना सारखी म्हाया म्या पोरगी बघा गटवली
अन व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी म्या पोरगी एक पटवली !!!!!!!!

गोष्ट अशी एका भेटीची ....

गोष्ट अशी एका भेटीची ....


तिची अन् माझी अशी अचानकच पडली गाठ
दर्शनी पाहता तिला माझी लागली पुरती वाट
हृदयाचे ठोके जसे ढोल वाजत होते
लटपट लटपट पाय तालावर नाचत होते

डावी भुवई उंचावून तिने एक कटाक्ष टाकला
प्रथमदर्शी प्रेमाचा मिळाला मला दाखला
तिचे लुकलुकले डोळे अन् गुलाबही उमलले
प्रीतीच्या फुलांचे गंध माझ्या मनी दरवळले

क्षणभर सर्वत्र स्तब्ध निरव शांतता पसरली
नजरेने नजरेला दिलेली साद मात्र समजली
सावरून बावरून तिने परतीची वाट धरली
दोन क्षणांची साथ, पण मनात कायमची भरली

एकदा मागे वळून पहावे मनाने केला अट्टाहास
आहे हे सत्य का होतोय मज हा भास
तिची धावती पावले माझ्या रोखाने येत होती
हात पसरून मी मिठीत घेण्याची दुरी होती

मला दूर  सारून ती तशीच पुढे गेली
बिलगून त्या व्यक्तीच्या दुचाकीवर स्वार  झाली
अशाप्रकारे माझ्या मनाचा झाला होता पचका
प्रथमदर्शी प्रेमाचा बसला मनाला धसका.................!!!!

विज्ञानावर प्रेम बसलय...

 विज्ञानावर प्रेम बसलय.

मी फार टेक्नीकल बोलतो,
अस सारख वाटत होत तिला,
"मै ऐसा ही हूँ " म्हणुन ,
सांगू तरी कस तिला .

ती म्हणते बघ ना रे,
सुटलाय धुंद गार वारा,
मी म्हणतो हवामान खात्याने,
दिला होता कालच इशारा.

ती म्हणते हात तुझा ,
किती उबदार वाटतो मला,
मी म्हणतो बहुतेक असेल ,
किंचितसा ताप मला.

मी म्हणतो समुद्राच्या पाण्यात ,
कैल्शियम च फेस आहे ,
ती म्हणते काही सांगू नकोस ,
तू मोठी सायकोलोजिकल केस आहेस .

ती रोमांस मधली नजाकत मला सांगते,
मी सुद्धा गुणसुत्रांची गुंतागुंत सांगतो,
ती कपाळावर स्वतःच्या मारून घेते ,
मी पुढच्या वाक्याची वाट पाहतो .

आता हळू हळू मला प्रेमाचे,
विज्ञान कळायाला लागलय ,
तिलापन माझ्या सोबत राहून,
विज्ञानावर प्रेम बसलय.

फेसबूक फेसबूक फेसबूक ………

फेसबूक फेसबूक फेसबूक ………


हाय हेलो पासून होते सुरुवात
मग हळूहळू मिळतात दोन दोस्तीचे हात
तो म्हणतो How Are You  ती म्हणते I Am Fine  
तिने विचारले How Are You  तर तो म्हणतो I Am Very Fine
ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला लागतच नाही भूक
फेसबूक फेसबूक फेसबूक ………

असो दहावी, बारावी किंवा पंधरावीचा अभ्यास
आमचा तर लागला आहे फक्त फेसबूक मध्ये ध्यास
आई ओरडून म्हणते अभ्यास कर निर्लज्जा
आम्ही तिला म्हणतो आई फेसबूकमध्ये किती ग मज्जा
परीक्षा आली जवळ तरी हातात नाही आमच्या बूक
फेसबूक फेसबूक फेसबूक ………

काय ह्या फेसबूकचा रंग  
सर्व कामधंदे सोडून आम्ही त्यातच दंग
कसा पसरला हा फेसबूकचा गंध
या फेसबूकला व्यसन म्हणावं की छंद
आता त्यात आमची तरी काय चूक
फेसबूक फेसबूक फेसबूक  ………

दिवसभर ऑनलाईन बोलून आम्ही जरा पण थकत नाही
फेसबूक शिवाय दुसरीकडे आमचा लक्षच लागत नाही
ऑफिसमध्ये गेल्या गेल्या ठेवतो एका कोपऱ्यात Bag
आम्हाला तर करायचे असतात Friends ला फोटो Tag
काही मुली बोलतात नाजूक तर काहींना खूप घमेंड
आम्ही मात्र चुकवत नाही दयायला कमेंट
फेसबूकचे पण एक दिवशी नक्कीच होईल Certification
जर अश्याच आमच्या अकाउंटमध्ये येत राहिल्या Notification
तसे तर किती जण करतात आम्हाला फेसबूक सोडण्याबद्दल सजेस्ट
आम्ही मात्र आवर्जून बघतो कोणाची आहे का नवीन फ्रेंड रिकवेस्ट
आम्ही ठेवत नाही फ्रेंड रिकवेस्ट कोणाची वेटिंग
आमची रिकवेस्ट असेल कदाचित कोणाकडे पेंडिंग
पण आम्ही करत नाही Friendship मध्ये चीटिंग
Request  बघून काही मूर्ख शोधत बसतात त्यात ही Concept
आपलाच Friend आहे असं समजून आम्ही करतो त्याला Accept
रात्रभर Chatting करून उडून गेली आहे झोप
आई म्हणते खूप रात्र झाली आहे मेल्या आता तरी झोप
अभ्यासाची तर आम्ही सोडूनच दिली आहे आशा
जेव्हा पासून लागला आहे ह्या फेसबूकचा  नशा
आई सगळ्यांना सांगते की आजकाल आमच्या पोराचं अभ्यासात लक्ष लागतंच नाही
आम्ही म्हणतो आई जरा थांब ग तुला फेसबूक मधलं काही कळतंच नाही
आई म्हणते दिवसभर फेसबुकवर असतोस तुला एवढे त्यात काय रे दिसते
आम्ही म्हणतो काय करणार तुझी होणारी सून आमच्याशी बोलत बसते
त्यावर आई म्हणते माझ्या  बाळा फेसबूक बंद कर नाही तर तुझं डोकं होईल Block
आम्ही म्हणतो प्रिय आई आता Chatting करू दे नाही तर फेसबूक होईल Lock
फेसबूकच्या नादामुळे कळत नाही काय बरोबर काय चूक
फेसबूक  फेसबूक फेसबूक ……….

कलयुगातील प्रेम...

कलयुगातील प्रेम

परमेश्वरही म्हणत असेल कि...
प्रेमात प्रेम कोणाचे तर त्या कलयुगातील लोकांचे

त्यांच्यासारखे प्रेम तेव्हा करणं शक्य नव्हते.
कारण तेवढे साधनं तेव्हा available नव्हते.

आता आहेत mobile अन मस्त technology
तेव्हा समोरासमोर कठीण वाटे fecology

आहेत त्यांच्याजवळ वरदान twitter अन facebook  चे
कुठूनही download अन files share करण्याचे

भलतीच सोय आहे friend request पाठवायची
accept केल तर ठीक नाही तर लगेच दुसऱ्याला शोधायची

जगभरातील पोरी पठ्ठा घरीच कॉम्पुटर वर शोधते
तिने नाही म्हटलं तरी आपला प्रयत्न सुरु ठेवते

कर्मन्नेवा धीकारस्ते मां फलेषु कदाचन
अस म्हणून आपल्यालाही भाग पडते त्याला देन

बुद्धीचा मनुष्याने जरा जास्त उपयोग घेतला
प्रेम करण्यात तो कधी मागे नाही हटला

म्हणून म्हणतो परमेश्वर
प्रेमात प्रेम कोणाचे तर त्या कलयुगातील लोकांचे

एका मेक़्यनिकचा प्रेमयोग...

 एका मेक़्यनिकचा प्रेमयोग...


तिच्या नजरेची हेडलाईट
माझ्या नजरेशी मिळाली
माझ्या मनाच्या टायरची
हवाच ढिल्ली झाली

तिच्या होकाराच्या पाण्याने
आमच्या प्रेमाचा नटबोल्ट आवळला
आमच्या वचनांचा पेट्रोल टेंक

आम्ही गदागदा ढवळला
 सुरु झाली गाडी बोलाचालीची
वाढू लागली रीडिंग आमच्या प्रेमाची

पण , किती दिवस चालेल गाडी
कालानुरूप जुनी झाली थोडी

एक-मेकांच्या आवडीचे
टायर घासू लागले
आमच्या प्रेम  इच्छेचे जणू
इंजिन काम बघा निघाले

आमच्या प्रेम गाड्याचा
अबोल गाडा झाला
 ब्रेक न लागल्याने

अपघात  झाला
अपघात  झाला........

श्वास धरणीचा कोंडला...

श्वास धरणीचा कोंडला...

श्वास धरणीचा कोंडला,
जाउ लागले तडे
पाण्याच्या थेंबासाठी
जीव माणसाचा जळे!

रक्त आले डोळी
पाय आता लटपटे
माउलीच्या डोईवर
का रिकामेच घडे?

काळ्या भुईत अडला,
जीव कोणाचा खोल
नांगराच्या फाळ्यातुन
वाहे  रुधिर कोमल!

आकाशी आले विमान
तुका बैसीला देहाविन,
बोला आता पांडुरंग
जय हरी पांडुरंग!!

पिडीत सुनेची एकंच कथा...


पिडीत सुनेची एकंच कथा...

पिडीत सुनेची एकंच कथा
ती म्हणजे जुन्या रीतीची नवीन प्रथा

आज कालच्या पित्याचा पण बनलाय एकंच फंडा
मुलाचा जन्म म्हणजे सोन्याचा अंडा
मुलगी जन्मली कि द्यवा लागतो हुंडा

सोन्याच्या चेन साठी सासूचा छळ
घरी मागताना होई सुनेच्या हृदयात कळ

एव्हड पण येत नाही तिच्यात बळ
कि ह्या नरकातून काढावा लवकर पळ

पण इथे पण तिच्या हृदयाला कळ..
माय-बापाच्या अब्रूला लागेल मळ

मग कुण्या बाळाची आई होणारी ती सून.
अंगावर घेते सर्व दुख ओढून
आणि जाते ह्या निर्दयी जगाला सोडून..

ह्याच त्या यातना ..आणि हीच ती कथा
आणि यालाच म्हणतात जुन्या रीतीची, नवीन प्रथा ..

कसली ग तुला चिंता....

कसली ग  तुला चिंता....

नवरा बेवडा मिळायची
कि प्रियकर सोबत पळून जायची.
आई-वडलांच्या अब्रू ची
का लग्नासाठी लागणाऱ्या हुंड्याची..

कसली ग तुला चिंता..
रात्री ची तुझी झोप उडाली
कारण तूच त्याच्या प्रेमात बुडाली
त्याला नाही ग बाई तुझी चिंता.

मग होवूदेन प्रेमाची चिता
मनाच्या भावनांमध्ये तूच तरंग्तेस
आणि अर्धवट स्वप्नांना तूच रंगवतेस..

कश्यासाठी हे तू करतेस..
आणि कुणासाठी तू झुरतेस..
संग न कसली ग तुला चिंता
कसली ग तुला चिंता...

साधी भोळी दिसणारी तू..
खूप सुंदर हसायचीस
आणि रडताना पण शोभून दिसायचीस..

मग का
खऱ्या सौंदर्याच हरवून भान..
तूच केलास तुझ्या रुपाला घाण..
आणि तेच तुला वाटतंय पण छान
आणि तरी पण तुला सुंदर दिसायची चिंता..

कसली ग तुला चिंता ..
आत्ताच सावरून घे बर
नाहीतर होवून जाईल
चिंता ता ता  चिता चिता चिंता ता ता.....

हरवलेली माणुसकी....

हरवलेली माणुसकी....

कुलदीपकच हवा, शुध्द अंधविश्वास.
मुलीचा गर्भ पोहचे,पार गटार गंगेस.
निसर्गाचा समतोल पार बिघडून जाई.
पुरुषाचा स्त्रीवाचून जन्मच वाया जाई.

भ्रष्ट आचार आता नित्य नेम झाला.
अंध वासनांच्या त्या उफाळती ज्वाला.
कधी बळी जाते बिचारी अबला नार.
तर कधी होरपळे ते बाल्य सुकुमार.

संपत्तीचाच हव्यास भर-भरून राही.
भावाची ओळख आता भावास नाही.
अविचार , स्वार्थाने भिनली जमात.
माता-पित्यास सोडती दूर वृद्धाश्रमात.

नीती मूल्यांचा होई र्‍हासच जणू हा.
सभोवर जनावरांचा भासच जणू हा.
प्रकृतीचे हे दुष्ट स्वप्न विरून जावे.
मनुष्यास माणुसकीचे आता भान यावे.

Thursday, 14 June 2012

असं म्हणण्यात काय अर्थ आहे?

जीवनरूपी झऱ्यातलं पाणी
झिरपत झिरपत जाऊन कालांतराने कमी होतं
असं म्हणण्यात काय अर्थ आहे ?
या झिरपणाऱ्या पाण्यामुळेच रुजवलेलं पीक 'सुपीक' होतं

असं समजायला काय हरकत आहे?
आपल्या नशिबात हे नाहीच
असं म्हणून निराशा पदरी पडून घेण्यात काय अर्थ आहे?

  - आकाशाकडे बघत चाललो होतो म्हणून ठेच लागून पडलो
असं समजायला काय हरकत आहे?
आम्ही तुमच्यासारखे 'अमुक' असतो
तर 'तमुक' करून दाखवले असते
असं म्हणण्यात काय अर्थ आहे?

- आपण तसे ''अमुक'' नव्हतो म्हणूनच
आपल्या जीवनातली ''चुकामुक'' टळली
असं समजायला काय हरकत आहे?

आयुष्य म्हणजे खेळ डोम्बार्याचा



आयुष्य म्हणजे खेळ डोम्बार्याचा......



आयुष्य म्हणजे खेळ डोम्बार्याचा
पोटासाठी मैलोनमैल फिरायाचा
अंगी कमावलेले कौशल्य दाखवण्याचा
त्याचं उमेदीनं पुढे पुढे चालण्याचा

आयुष्य म्हणजे खेळ कुंभाराचा
जीवनाच्या मातीत संस्कार ओतायचा
बनलेल्या चिखलाचा माणूस घडवायचा
अस्सल मडकीच निवडण्याचा
खोटारडी मातीमोल होण्याचा

आयुष्य म्हणजे खेळ चुलीवरचा
भाकर भाजता भाजता हात भाजण्याचा
विस्तव फुकता फुकता डोळे पाणावण्याचा
गिळून भाकर तृप्त होण्याचा
अन् पुन्हा पोटासाठी धडपड करण्याचा

आता सर्व काही आठवेल तुला....

आता सर्व काही आठवेल तुला....
आता सर्व काही आठवेल तुला....

अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही      
 प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता

याची परतफेड करशील..
 मान खाली घालशील शरमेने..

खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..

    कीनारी पोहोचवशील
 पाचव्या ईसमाच्या मदतीने..

हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला

    माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल

नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे

    तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील

उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील

    देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही....माझा आणि तुझाही...

    - तुझी प्रेमस्वरुप आई

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...