तात्पुरत्या समस्यांसाठी घेतलेला कायमचा पर्याय...
नाव घेताच गोष्टीचे फिरतात आपोआपच पाय..
जीवनाची शैली जाणली आहे का कोणी .....?
तो, ती किंवा ते याचा मालक तरी कोण.......?
काय चुकल ? या निसर्गमय जीवनाकडून कोणाचे
नका घालू हातकडी जे आहे दुसऱ्याचे
का उचलतात लोक असले पाऊल ?
जीवनाला मरणाची लागते चाहूल
प्रसंगाला सामोरे जायचे भान उरत नाही
कारण तुमच्या डोक्यातच काही शिरत नाही
असे पाऊल उचलण्याची पूर्वी नव्हती प्रथा
ते लोक सहजच सहन करायचे अशा व्यथा
तुम्हीच आहात तुमच्या घराण्याचा चिराग
मग आज या फुलावरील कुठे गेले पराग ?
नका करू असा विचार नका करू प्रवृत्त
या वेदना सहजच छापतात मग वृत्तपत्र
तुकारामांची गाथा, समर्थांचे श्लोक ,वाचायचे कोणी..?
आम्हाला दिसतात ,आमचेच tension अन आमचीच रडगाणी
सोडून द्या नकारात्मक विचार
पहा जरा डोळे उघडून
कोणीतरी नक्कीच फिरवेल हात
तुमच्या खचलेल्या पाठीवरून
कोणीतरी नक्कीच फिरवेल हात
तुमच्या खचलेल्या पाठीवरून ........
नाव घेताच गोष्टीचे फिरतात आपोआपच पाय..
जीवनाची शैली जाणली आहे का कोणी .....?
तो, ती किंवा ते याचा मालक तरी कोण.......?
काय चुकल ? या निसर्गमय जीवनाकडून कोणाचे
नका घालू हातकडी जे आहे दुसऱ्याचे
का उचलतात लोक असले पाऊल ?
जीवनाला मरणाची लागते चाहूल
प्रसंगाला सामोरे जायचे भान उरत नाही
कारण तुमच्या डोक्यातच काही शिरत नाही
असे पाऊल उचलण्याची पूर्वी नव्हती प्रथा
ते लोक सहजच सहन करायचे अशा व्यथा
तुम्हीच आहात तुमच्या घराण्याचा चिराग
मग आज या फुलावरील कुठे गेले पराग ?
नका करू असा विचार नका करू प्रवृत्त
या वेदना सहजच छापतात मग वृत्तपत्र
तुकारामांची गाथा, समर्थांचे श्लोक ,वाचायचे कोणी..?
आम्हाला दिसतात ,आमचेच tension अन आमचीच रडगाणी
सोडून द्या नकारात्मक विचार
पहा जरा डोळे उघडून
कोणीतरी नक्कीच फिरवेल हात
तुमच्या खचलेल्या पाठीवरून
कोणीतरी नक्कीच फिरवेल हात
तुमच्या खचलेल्या पाठीवरून ........
No comments:
Post a Comment