Monday, 17 June 2013

आपणच ठरवल होत ना रे...

आपणच ठरवल होत ना रे
कधीच सोडायची नाही साथ एकमेकांची
पण, आयुष्यात कुठे काय ते मोठे वादळ आले
अन्, आपल्याला एकमेकांपासून दूर करून गेले....

... कधीतरी विचार कर रे परत येण्याचा
मी नाही काही बोलेन तुला
तू फक्त माझ्याकडे येण्याचा प्रयत्न तर कर
मी स्विकारेन तुला सगळ्या दुःखा सहित
नको देऊस सुख मला
पण असा एकटा तरी नको सोडून जाऊस....

माहित आहे रे मला
तू फार जिद्दी आहे
नाही येणार तू परत तरी मी वाट पाहिन तुझी
या श्वासाचा अंत होई पर्यंत......... ..

तुझ्याच साठी मागतो...

तुझ्या मुलेच तर माझ्या कवितेला जोड आहे,
म्हणूनच कि काय मला तुम्हा दोघींची इतकी ओढ आहे...♥♥

खर तर तू आणि कविता दोघी एकाच माळेचे मणी,
विसरू नाही देत मला तुम्ही दोघीही जणी...♥♥

तूच आहेस कविता माझी, अन कवितेतही तूच असतेस,
तू जवळ नसतेस तेव्हा तीच जवळ येऊन बसते...♥♥

अशाच घट्ट राहू देत तुमच्या प्रेमळ भेटी गाठी,
तू माझ्या कविते बरोबर अन मी तुम्हा दोघांसाठी...♥♥

माझ्यावर कविता नको करूस असे देखील बोलतेस तू,
कवितेत येऊन माझ्या प्रेमाचे सारे राज खोलतेस तू...♥♥

कितीही नाही बोललीस तरी माझ्या कवितेला माहित आहे,
अखेर माझ्या सोबत तीही तुझीच वाट पाहीत आहे...♥♥

श्वास आहे ती माझा म्हणूनच कविता करून जगतो,
काही नको मला देवाकडे, सार तुझ्याच साठी मागतो...♥♥

कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर...

पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर

वेड मात्र तुझे आहे.......

झोप माझी असली तरी
स्वप्न मात्र तुझे आहे
रंग माझे असले तरी
चित्र मात्र तुझे आहे

ह्रदय माझे असले तरी
ध्यास मात्र तुझा आहे
नजर माझी असली तरी
भास मात्र तुझा आहे

शब्द माझे असले तरी
वर्णन मात्र तुझे आहे
वेडा मी असलो तरी
वेड मात्र तुझे आहे

आयुष्य माझे असले तरी
त्यावर हक्क फक्त तुझा आहे
पूर्ण नसलो जरी मी
अपुर्ण मात्र तुझ्या मुळेच आहे

एका क्षणात होत...

भीती वाटते कोणाला आपल बनवायची...
Photo: i miss uभीती वाटते कोणाला आपल बनवायची...
भीती वाटते काही वचने निभवन्याची...
 

भीती वाटते काही वचने निभवन्याची...

प्रेम तर एका क्षणात होत...
पण मोठी किम्मत मोजावी लागते.... विसरन्याची...

खुप ञास होतो जवळचे दूर होताना .....
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना..

कधी आयुष्यात आलीस...

कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झालीस काही कळलेच नाही..
एक एक दिवस जात होता ..
अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..
कदाचित तुला मी वेडा वाटत असेन..
अन होय मी वेडाच आहे तुझ्याच साठी..तुझ्याच साठी..

शोन्या I Love u...

Gf : तुझ माझ्यावर प्रेम का आहे. . . .?

Bf : असच. . . .!! आहे माझ प्रेम पिल्लू. . . .

Gf : Satisfy होत नाही आणि परत विचारते
मला कारण सांग ना शोन्या. . . . . .

Bf : बर. .!! ऐक तु माझी ईतकी काळजी घेत
मला मदत करते माझ्यावर प्रेम करते
म्हणून. . . .

Gf : खुश होते. . . .
पण काहि दिवसांनी ती खुप आजारी पडते
ती त्याची काळजी घेऊ शकत नव्हती
त्याला मदत करु शकत नव्हती. . . . . .
ती घाबरते
त्याला विचारते
शोन्या अजून माझ्यावर प्रेम करतोस

Bf : हो ग पिल्लू

Gf : पण मी तर अशी म का

Bf : आता कळल का पिल्लू तुला प्रेमाला कारण
नसत लागत ते होउन जात
ज्या प्रेमात कारण असत ते प्रेम कसल
गं. . . . .

Gf : sorry शोन्या I Love u

Bf : love u 2 पिल्लू. . .

ती नेहमी म्हणायची...

ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !
स्वप्न परीचे पाहिले की तिला सांगायचो,
परीचा राजकुमार मीच अशा काही कल्पना करायचो,
स्वप्नात हि स्वप्ने रंगवत असाच काही वागायाचो,

ती नेहमी म्हणायची स्वप्ने पाहू नकोस !

मनातल्या भावना तिच्या कडे व्यक्त करायचो,
उगवत्या सूर्या पासून ते मावलत्या सूर्या पर्यंत
फक्त तिच्या गोष्टी करायचो,
रात्रीच्या चंद्रा कडे पाहुन तिच्याच स्वप्नात डुबायचो,


ती नेहमी म्हणायची पण ऐक्नार्यातला मी कोण...?
स्वप्ने पहाता-पहाता इतका काही गुंतलो,
की पुन्हा वास्तव्यात येन स्वप्न होउन राहिले,

मैत्री हि हरवली,
परी हि हरवली,
राहिला तर फक्त पचतावा....!
अस तुमच्या सोबत होउन देऊ नका

"होती एक
तिच्यावर खुप मी प्रेम करायचो
तिची आठवण आल्यावर कविता करत बसायचा..
" वेडा होतो अगदी वेडा"

दूरावा म्हणजे प्रेम...

दूरावा म्हणजे प्रेम...

अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम..दूराव्यात असते आठवण...
अन, ऒलाव्यात असते ती साठवण...दूराव्यात अनेक भास असतात...
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..दूरावा असह्य असतॊ...
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ...दूराव्यातही असावा ऒलावा...
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा..दूराव्यात प्रेमाचं घर असतं,अन,
ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं...
दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?
ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा...

दूरावा म्हणजे प्रेम...

कुणी नसत रे...

आज खरचं कुठे मी चुकलो असेलका ?
याचा शोध करायचा आहे ♥

आज पासून तिच्याशिवाय का होईना पण
एकटेच जगण्याचा प्रयत्न करायचा आहे ♥

तिने कायमचे दुरावले मला

हेच मनाला घट्ट समजावयाचे आहे ♥

आज तू परत एकटाच या जगात
हेच त्याला बजावयाचे आहे ♥

कुणी नसत रे आपल वेळेवर
याचीच त्याला जाणीव द्यायची आहे♥

आता तुला एकटेच जगायचे आहे
हेच त्याला आता शिकवायचे आहे♥

अरे! हे वेड्या रडतोस कशाला?
तुला तिच्यासाठी रडूनही हसायचे आहे♥

ती खूप सुखात राहावी आयुष्यात
म्हणून तुला दुखःतच जगायचे आहे ♥

विसरायला सांगितले ना तिने तुला?
मग तिच्या सुखासाठी तू खरच विसरलास हेच तुला तिला दाखवायचे आहे ♥

चल सोड तो विषय आता कारण......
आज पासून तुला परत तिच्याशिवाय  मरायला शिकायचे आहे

क्लास मध्ये अनेक गोड मुली असतात...

क्लास मध्ये अनेक गोड मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

क्लास मध्ये मुली शॉर्ट टॉप घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून टॉप खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.

क्लास मध्ये मुली जीन्स घलुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

क्लास मध्ये अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

क्लास मध्ये अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते................

फक्त आठवणीत उरलं...

खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीत उरलं.

जेव्हा तुला पाहिलं, तेव्हाच मी जाणलं
प्रेम मी फक्त तुझ्या डोळ्यात पाहिलं.
जेव्हा तुला पाहिलं, तेव्हाच मी जाणलं
त्याक्षणी माझ्या मनांत तुझं प्रेम जागलं.

प्रेम हे कधी लपत नसतं, ते आपसूकच दिसतं
तू कधीच सांगितलं नाही, तुझ्या डोळ्यात ते नेहमीच दिसलं.
प्रेम हे कधी लपत नसतं, ते आपसूकच दिसतं
प्रेम कधीच कळत नाही, ते हळूच स्पर्श करतं.

प्रेम मी जीवापाड केलं, तुझ्यासाठी मी आयुष्य जगलो
तू कधीच बोलली नाहीस, पण मी ते कधीच जाणलं.
प्रेम मी जीवापाड केलं, तुझ्यासाठी मी आयुष्य जगलो
तुझ्यासाठी फक्त मी, माझं जगणं तुझ्या नावे केलं.

आता काहीच नाही राहिलं, आता फक्त आठवणीतच उरलं
तू सोडून गेलीस अन डोळ्यात पाणी तरलं.
आता काहीच नाही राहिलं, आता फक्त आठवणीतच उरलं
तुझ्या आठवणीत फक्त आता माझं आयुष्य उरलं.

खरं प्रेम जे तू पाहिलं, जे मी केलं
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीत उरलं.

एक प्रेमळ विनोदी सत्य...

एक प्रेमळ विनोदी सत्य :
.
मुलगा जेव्हा चूक करतो तेव्हा मुलगी त्याच्यावर ओरडते....!!!
मुलगा बोलतो "सॉरी"
.
..
... ...

...
..
.
मुलगी जेव्हा चूक करते तेव्हा मुलगा तिच्यावर ओरडतो....!!!!
मुलगी रडायला लागते
मग मुलगाच परत बोलते"सॉरी".......

फक्त तुझ्यासाठी...

एक हास्य उमटते ......फक्त   तुझ्यासाठी
एक चेहरा खुलतो......फक्त   तुझ्यासाठी
एक अविस्मरणीय भेट ...फक्त तुझ्यासाठी
एक मार्ग चालतो....... फक्त तुझ्यासाठी
एक मंझील दिसते ... फक्त तुझ्यासाठी
एका रस्त्यावर वाट पाहतो...फक्त तुझ्यासाठी
एक स्वप्न पाहतो..........फक्त.तुझ्यासाठी
एक प्रार्थना देवाकडे.....फक्त तुझ्यासाठी
एक जन्म घेतला..... फक्त तुझ्यासाठी
एक आयुश्य जगतो .... फक्त तुझ्यासाठी
एक मन झुरते .....फक्त  तुझ्यासाठी
एक जीवन कुर्बान.....फक्त तुझ्यासाठी
एक आत्मा तळमळतो....फक्त तुझ्यासाठीखरंच फक्त तुझ्यासाठी....फक्त तुझ्या आणि तुझ्याचसाठी

आता मी ठरवलय...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
माणसांमध्ये जाऊन बसायचं, छान छान बोलायचं, खोटं खोटं हसायचं
आणि अजून माणसात आहे असं दाखवायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
माझं सोडून त्यांचं रडगाणं ऐकायचं.. सूर कुठे जुळतात का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
मनात आभाळ दाटून आले की बाहेर पडणाऱ्या पावसात भिजायचं
मग ह्या शरीराबरोबर मनालाही गारवा मिळतो का ते पहायचं...

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
हळवं बिळवं व्हायचं नाही..रुतलेल्या काट्यांना मलमपट्टी करायची..
दारू पेक्षा दवा काही काम करते का ते पहायचं......

आता मी ठरवलय एकदा असही करून पहायचं...
खोलीत जाऊन दार घट्ट बंद करून घ्यायचं..खिडक्या बंद करून पडदे ओढून मिट्ट अंधार करायचा..
पोटात पाय घेऊन मनसोक्त रडायचं आणि खरंच मन मोकळं होतं का ते पहायचं...

आठवतं का ग तुला...

आठवतं का ग तुला...........

आठवतं का ग तुला तो दिवस जेव्हा मी तुला Propose केलं होतं...
आठवतं का ग तुला जेव्हा मी तुला Message करून तुझ्या मनातलं तुला सांगितलं होतं...


आठवतं का ग तुला माझ्या आठवणीत ते तुझं रात्रं रात्रं जागून रडणं...

आठवतं का ग तुला मला भेटण्याची ती उत्सुकता तुझ्या चेहऱ्यावर दिसत होती...

आठवतं का ग तुला आपली ती पहिली भेट जेव्हा तू माझ्या मिठीत येऊन रडली होतीस...

आठवतं का ग तुला ते आपलं रात्रं रात्रं उशिरा पर्यंत Phone वर गप्पामारणं...

आठवतं का ग तुला ते आपल्या भेटण्याचे सुखद क्षण जे कधी न विसरण्यासारखे आहेत..

आठवतं का ग तुला ते तुझं ते छोट छोट्या गोष्टींवर्ती माझी चूक नसतानारागावणं आणि माझं तुझं प्रेमाने मनवणं...
आठवतं का ग तुला तो दुःखाचा दिवस जेव्हा आपण शेवटचं भेटलो होतो कधीच न भेटण्यासाठी...
आठवतं का ग तुला खरंच आठवतं का ग तुला
हे सर्व क्षण खूप रडतो ग मनापासून जेव्हा सर्व आठवतं तेव्हा कदाचित तू सुधा रडत असशील ..
पण आता आयुष्यात फक्त आठवणीच राहिल्यात आणि त्याच आठवणींना घेऊन जगायचं आहे. .
कारण ......

आठवणीत जागू दे...

कधीतरी तुझ्या डोळ्यांना माझ्या आठवणीत जागू दे...
कधीतरी तुझ्या मनाला त्याच्या मनाने वागू दे...

आनंदाश्रू असताना जे अमृतासारखे वाहतात...
तेच अश्रु दु:खामध्ये विष बनू पाहतात...
 
डोकं एकदा तापलं की तुझासुद्धा राग येतो...
पण या क्षणिक रागामध्ये प्रेमाचाच भाग येतो...

तुझ्यासोबत खेळताना मी हरण्यासाठीच खेळत गेलो...
जिंकण्याकडे दुर्लक्ष करून मी मैत्रीचे नियम पाळत गेलो...

गुलाबाच्या फुलासोबत किमान एकतरी काटा असतो...
'त्या' नाजुक फुलाच्या संरक्षणात त्याचा सिंहाचा वाटा असतो...

आयुष्य असचं जगायचं असतं...

जे घडेल ते सहन करायचे असतं,
 बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं
आयुष्य असचं जगायचं असतं..

कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, 
कुठतरी थांबायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, 
स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं
आयुष्य असचं जगायचं असतं..

दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं,
हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, 
आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी 
मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, 
पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,
आयुष्य असचं जगायचं असतं..

कसे धन्यवाद देऊ तुला..
आयुष्य असचं जगायचं असतं..

कुणाला जाणीव ही नसते ...

कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,
कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,
किती त्रास
द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते ...

कुणाचेच नसतात हक्क कुणावर...

पण जीव तरीही जडतातच ना? कुणाचेच नसतात हक्क कुणावर
पण तरीही डोळे भरतातच ना? "अपेक्षाच करू नये अश्या"
पण अपेक्षा तरीही उरताताच ना? सगळ्या हाती उरायचे शुन्यच
पण जीव तरीही जडतातच ना? हिशेबच मांडायचा सगळा
... तर आकडेही पडतील कमी तरीही सुख मोजतांना
पापण्या तुझ्याहि भिजतातच ना?  सगळ्या हाती उरायचे शुन्यच
पण जीव तरीही जडतातच ना? लाख असेल झाला
दगड तुझ्या काळजाचा पण झिडकारतांना हात माझा
मनात वेदना असतातच ना ? सगळ्या हाती उरायचे शुन्यच
पण जीव तरीही जडतातच ना..

कसं ग सांगू ..!!

कसं ग सांगू ..!!
तुझी काळजी आवडली मला, तुझी हुरुहूर आवडली मला,
तुझं रागावणं आवडलं मला, तुझं समजावणं आवडलं मला,
चेहऱ्यापेक्षाही तुझं मन आवडलं मला.

नेहमी तुझं बोलणं मला खुपवेड लावतं,
नेहमी तुझ्याच सहवासात रहावं वाटतं,
जग मला म्हणेलही वेडा पर्वानाही मला,
इतकंच कळतंय कि "फक्त तूच आणि तुच
हवी मला".

नावापुढे माझ्या मला तुझंच नाव हवंय,
छोटंसंच घरकुल पण ते तुझ्यासोबत हवंय,
किती दिवसाचं आयुष्य माझं मला नाही ग
ठाऊक,
दिवस नाही ढकलायचे ग...मला तुझ्यासोबतचं
जगणं हवंय.

छळ म्हणून तरी एखाद्याने किती ग करावा ?
फक्त स्वप्नातच हात सांगना मी किती दिवस
धरावा ?

मनात ये माझ्या ते कधी न मोडण्यासाठी,
हातात घे हात माझा तो कधी न
सोडण्यासाठी..!!

वाट पाहतोय मी.. तू वाऱ्यासारखी ये, पण
माझ्या जवळच थांब नेहमी..
वाहून नको जाऊस
त्या वाऱ्यासारखी..दुसरीकडे..

मी हो म्हणलं म्हणुन !!



मी हो म्हणलं म्हणुन..तु हो म्हणायलाच पाहिजे, अशी काही सक्ती नाही...
प्रेम काय.! काल होत, आज आहे ,उद्याही होईल..
करायलाच पाहिजे.. अशी काय ती देवाची भक्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....

... तुझ्यात मी आणि तु माझ्यात तुला शोधायचीस,
भेट नाही घडली की, अगदी कासावीस व्हायचीस.
आठवत तुला ते खाली उतलेलं आकाश ,तलावातील चांदणं..
अगदी सुर्य घरी परतल्यावरही,चालु राहिलेलं आपआपसातलं बोलणं..
तुझ्या माझ्या आठवणीखेरीज, हृदयावर कोणाची जप्ती नाही.
मी हो म्हणलं म्हणुन....

काहीनाही फक्त आठवण देण्याकरीता ग,
तुच म्हणायचीस.. स्वप्नात काय.., डोळे उघडे असतांनाही तुच दिसतोस.
माझ्या श्वासा श्वासात, तु अन् तुच भिनतोस..
जाऊ देना..! जास्तीत जास्त काय होईल,
माझा रोल, कुणी दुसरा घेइल.
मीच पाहिजे प्रेमासाठी.. अशी माझ्यात दैवी शक्ती नाही..
मी हो म्हणलं म्हणुन....

आठव तुच म्हणाली होतीस,
मैत्रीचं नातं आता प्रेमात बदलतयं..
तरीही मी ठाम नाही.
चार पावसाळे जाऊ दे..
तुझं सगळं ठरलं की, उत्तर फक्त आणुन दे..
लवकर उत्तर येण्यासाठी ही काही युक्ती नाही
मी हो म्हणलं म्हणुन..

तू नक्कीच होशील माझी...

मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... तू नक्कीच होशील माझी,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... तू असशील माझ्या बाहूपाशी,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... माझ्या मनीच्या भावना,
समजू लागतील तुलाही; माझी स्वप्नं सत्यात उतरतील,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... तुझ्याही मनात रुजू लागेल,
प्रितीची निखळ भावना.... मोडून बंधनं तू येशील मजपाशी,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... सर्वांच्या मग अनुमतीने,
नात्याला आपल्या रुप मिळेल.... तू बनशील माझी अर्धांगी,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची.... आयुष्य माझे सखे,
समृध्द करशील तू सहवासाने.... आमरण आपुली साथ असेल,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची....

आपुली घडली होती...

दूर दूर त्या वळनावरती, भेट आपुली घडली होती..
बघता बघता दोघांचीही, ह्रदय जणू धडधडली होती..

ह्रदय अशी धडधडली जेव्हा, डोळ्यांचे जाहले इशारे..
तुझी पापनी अलगद उठता, तीर मनाला भिडले सारे..

तीर मनाला भिडतान्नाही, गंध तयाचा दरवळला..
हलके हलके श्वासही माझा, गंधासोबत विरघळला..

विरघळताना श्वास म्हणाला, सांग माझी तू होशील का?
चिंब भिजुनी पावसात या, मिठीत मजला घेशील का?

मिठीत मजला घेशील जेव्हा, धरणीला या सूर मिळे..
भेट आपुली पाहून राणी, मंद मंद पाउस जळे..

मंद मंद पाउस जळे हा, झुरू लागली ही धरती..
प्रीतिचा गुलमोहर फुलला, दूर दूर...त्या वळनावरती..

आपल्याबरोबरच का होतं...

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं??
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच शाळा बोअर वाटतं

अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी शाळा लाईफ बदलुन जातो

मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते
Result येत नसला तरी practicalकरावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण शाळेमध्ये यायची तयारी असते

असे करता करता......शाळेची वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र विरहाची आसवे देऊन जातात.....

आठवणीच्या सागरात !!

आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही,

अमावस्येच्या रात्रि चंद्र कधी दीसत नाही,

कितीही जगले कुणी कुणासाठी,

कुणीच कुणासाठी मरत नाही.

अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,

पण नशिबाचे चक्र थांबत नाही.

आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,

त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही...

आठवणी...

बालपणीच्या पावसातील आठवणी
आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस
शाळेत जायचा देखील जेव्हा यायचा मला आळस

आठवतो पावसासोबत येणारा तो गार गार वारा
नी मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा
वाऱ्यावर झुलणारी ती हिरवीगार झाडं
नी पावसात बागडणारी ती माझ्यासारखी वेडी मुलं

आठवते मला अजुन ती हौस चिंब भिजण्याची
पावसात जाऊन मनसोक्त गाणी म्हणण्याची
यत्किंचितही नसलेली ती आजाराची पर्वा
आईचा मात्र काळजीने जीव व्हायचा हळवा

आठवतात पाण्यात सोडलेल्या त्या इवल्याश्या होड्या
एकमेकांवर पाणी उडवुन इतरांच्या काढलेल्या खोड्या
ते स्वच्छ धुतलेले कपडे खराब व्हायचे चिखलात
पण आईच्या कष्टाचे विचारही नसायचे मनात

आठवतात मला त्यानंतर कडाडणाऱ्या विजा
नी मग घराकडे पळतांना धडपडुन झालेल्या ईजा
घरात गेल्यावरही ठरलेलं होतं बाबांचं ओरडणं
आईचे मात्र शांतपणे केस कोरडे करणं

आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे
नी सर्दी साठी जबरदस्ती घेतलेले ते कडूशार काढे
सरते शेवटी आठवते ते उघडणारे आभाळ
डोळ्यांसमोरुन तरळून जायची मस्तीत घालवलेली संध्याकाळ

अजुनही आठवते मला पावसातील लहानपणीची धमाल
नी आठवताना मग आसवांनी भिजून जातो रुमाल

का रडलीस …

का रडलीस …



माझे सर्वस्व अर्पण केल होतो मी….
तुझा भास..तुझा सहवास…..
तुझ्याच प्रेमात पडलो होतो मी….
नाही कधी मिळाले मज काही...
ना मिळाले काही मजआज...
स्वप्न रंगवत होते आपली….
पण स्वप्नांतील रंगच नाहीसे झाले आज…
खूप ठरवले होतो मीस्वत:शीच....
नाही पाहणार तुझ्याकडे कधीच...
पण प्रेम होते तुझ्यावर आधीच....
संपणार नव्हते ते आज व कधीच....
आज ती मला सोडून गेली होती....
काळीज मज काढून निघून गेली....
मरण सुद्धा मज नशीबात का नव्हते….
आयुष्याचे चित्र रंगहीन करून गेली
तू मला सोडून निघून गेलीस....
अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलीस...
मला विसरून जा म्हणालीस ...
मग का माझ्यासाठीच का रडलीस ….???

आठव जरा ते क्षण..!!

आठव जरा ते क्षण..!!
आज डोळ्यांत पाणी देऊन तू गेलीस
जे कधी स्वप्न मी पाहायचो तू माझ्या मिठीतच रहावीस
आयुष्यभर सोबत राहण्याचे ते स्वप्न आज स्वप्नंच बनून राहिले ..
आठव जरा ते क्षण..!!
तू आणि मी सोबत एकटेच बसायचो तू माझ्या डोळ्यांत आणि मी तुझ्या डोळ्यांत
रहायचो तुझ्या डोळ्यांत पाहताना मी हरवून जायचो तू तशीच डोळ्यांनीच बोलायची
मला म्हणायची तू मला सोडून कधीच जाणार तर नाहीस ना. मी तर वेडाच होतो
मला प्रेम तूच शिकवलेस हसणे काय असता रदन ए काय असता हे तूच जाणवून मज दिलेस
मी हि हसत तुला म्हणायचो वेडे तू तर माझा प्राण आहेस तुला सोडून कसे मी जाणार
आठव जरा ते क्षण..!!
भर पावसात मी तुझी वाट पाहत ओलेचिंब भिजायचो तू येण्याच्या वाटेवर नझर ठेवून
कासावीस मी व्हायचो मग तुझी चाहूल मज व्हायची तू यायचीस मला भेटायला एकच छत्री घेऊन
माझ्या कडे पाहून तू मला रागवायचीस का रे असा भिजतोस मी तर तुझीच आहे ना मग का
 तुला असा दोषी ठरवतोस मला नेहमीच एक भीती वाटायची तू मला सोडून तर जाणार नाहीस ना
मग तू मला घट्ट मिठी मारायची खरचं माझ्या सोन्या तुला कधीच सोडणार नाही ह्याची खात्री मज द्यायची
मग मला हि तेव्हा जिंकल्या सारखेवाटायचे आयुष्यभर हरणारा मी एक विश्वाच मी जिंकायचो
आठव जरा ते क्षण..!!
तू आणि मी भेटायला त्या बागेत बसायचो मी रागावलो तर हातात हाथ माझा घ्यायचीस
बघ ना सोन्या एकदा माझ्या कडे म्हणत मला जवळ तू करायचीस मी हि तेव्हा सगळे विसरून
 तुला मिठीत घ्यायचो,तू मग तेव्हा हसायची.
आठव जरा ते क्षण..!!
तूच सांगायची ना तू मित्रसंगत सोडून दे पण मीच वेडा मला मैत्री खूप आवडायची आयष्यभर
 हरलो मैत्रीत तरी त्यांनाच माझे जिवलग मित्रमी म्हणायचो आज हि वेळ आहे तीच जिथे मी एकटा पडलो
आठव जरा ते क्षण..!!

सांग ना कसं विसरू मी तुला !!

सांग ना कसं विसरू मी तुला !!

श्वास आहेस तू माझा,
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा.
सांग ना कसं विसरू मी तुला.

... माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.

एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

तुझ्या तो कोमल हाताचा स्पर्श,
मनात रुजून आहे कित्येक वर्ष.
कसा जाणार सहवास तुझा सांग मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.....तुझा ......

अशिच येशिल तु तेव्हा...

अशिच येशिल तु तेव्हा
मन होइल वेडे माझे पुन्हा पुन्हा
पक्षिहि गीत गातिल पाहुन तुजला
हळुच लाजेल सोनचाफा पानामधुनिया....
...


अशिच येशिल तु तेव्हा
घेउनि अ॑न॑त स्वप्ने सोबतिला
खट्याळ हसु गालि लाजारि बावरि होउनिया
सोनियाचि पाउले जनु ल़क्ष्मिच बनुनिया....

अशिच येशिल तु तेव्हा
कधि विरह नसेल जेव्हा
तुझे माझे प्रेम असेल इतके
स्वर्ग हि फिका पडेल तेव्हा......तुझा

एकदाच मला भेटशील का....

वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का....Photo: वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का....
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...?

पूर्वी तू माझ्याशी
खुप काही बोलायचास
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढायचास
तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचास
नसले विषय तरी
नविन विषय काढायचास...
काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचास
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचास
आता कशाला आमची गरज पडेल
असं म्हणून सारख चिडवायचास
माझा चेहरा पडला तर
खुप नाराज व्हायचास
मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचास...

आज ही मला तुझा
प्रत्येक क्षणी भास होतो
का रे असा वागतोस
का देतोस त्रास
नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास
शेवटचं एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास...

वेळ असेल तुला तर
एकदाच मला भेटशील का
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...
शेवटचं एकदाच मला भेटशील का...?
दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का...?

पूर्वी तू माझ्याशी

खुप काही बोलायचास
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढायचास
तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचास
नसले विषय तरी
नविन विषय काढायचास... काही ही बोलूंन मला खुप खुप हसवायचास माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचास आता कशाला आमची गरज पडेल असं म्हणून सारख चिडवायचास
माझा चेहरा पडला तर खुप नाराज व्हायचास मग जवळ घेऊन sorry ही म्हणायचास...

आज ही मला तुझा प्रत्येक क्षणी भास होतो का रे असा वागतोस का देतोस त्रास नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास शेवटचं एकदाच भेट मला पुन्हा नाही देणार त्रास...

वेळ असेल तुला तर एकदाच मला भेटशील का दोन शब्द बोलायचे होते
थोडं ऐकून घेशील का... शेवटचं एकदाच मला भेटशील का...?

प्रेम या शब्दाचा अर्थच थोडा वेगळा आहे...

Photo: पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत
कोणीतरी..

कोणालातरी हसतांना लपुन बघत असत
कोणीतरी..

दिवे सगळे विझल्यावर का जळत असत
कोणीतरी..

सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असत कोणीतरी..

कुणी येणार नाही तरी वाट बघत असत
कोणीतरी..

माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट
असत कोणीतरी..प्रेम !! या शब्दाचा अर्थच थोडा वेगळा आहे
या दोन शब्दातच मानतील भाव सगळा आहे

मी तुझावर खूप प्रेम करतो ......
हे ऐकल्यावरच मन कसं भर भरून येतं
आकाशा पेक्षा जास्त कुठे तरी या
दोन डोळ्यातच प्रचंड वादळ भरतं.

तू हवीस माला, मी नाही राहू शकत तुझा शिवाय....
या शब्दाने जग मोकळ झाल्याची जाणीव होते
पण जर तू माझा बरोबर आहेस
तर तळपळत्या उनाची ही जाणीव होत नसते..

तिचा स्पर्श,तिचा सहवास, तीच हसणं-रूसण
सारं सारं कस्स लक्खं लक्खं मनामध्ये असतं
भेटणायची तिला चाललेली धडपड
तिला एकदा पाहण्याची तळमळ किती मस्त

तुझा डोळ्यात मी अश्रु पाहू शकत नाही ...

या शब्दातच तिच्या बद्दलची काळजी असते
हसताना तिच्या गालावर पडणारी ती खळी
काळजाच पाणी पाणी करून टाकते

सुख दुखा सगळे गेले, बघ बघ आले तुझा जीवनात प्रेम आले

खरच खूप वेगळा असतं प्रेम खरच खूप वेगळा असतं न हे प्रेम!!!!!
-- 

अनेक माणसं भेटतात...

जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात  काही सांडून जातात
....... काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात, काही साथ देण्याची हमी देऊन,
... गर्दीत हरवून जातात........ नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,  आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........ पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही, कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही..

अनपेक्षित.

का असावी कोणासाठी अपेक्षा
का असावी आशा निराशा
जगत राहावे जगण्याचे मार्ग
असेच जगावे आयुष्य अनपेक्षित
जगलो अनेक उमेदी आशा-अपेक्षा
का भंगल्या त्या सर्व आकांक्षा..
उरली होती फक्त निराशा…
का असावी कसलीच आशा
असावे सर्वच अनपेक्षित..
उभा आहे आज मी असा
जगतो आहे जीवन निरपेक्ष
जे हाती येती तेच जीवन
उरले सर्व काही अनपेक्षित
नसाव्यात कसल्याच अपेक्षा
नसावी कुणालाच कसलीच अपेक्षा..
ना असावी कसलीच खंत
सुख शोधावे नव्याने पुन्हा एकदा
पहा एकदा जगून आयुष्य अनपेक्षित

आज मी तिला खूप miss करतोय...

Photo: आज मी तिला
खूप miss करतोय
कुठे हरवली काय
माहित आज मी
स्वतः स्वताशीच बोलतोय
जायचं तर सांगून तरी जायचं होत
अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय
आज मी तिला खूप miss करतोय
आली कि नुसती बडबड
आज जणू शांतता पसरलीय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
येईल या आशेवर
आज मी इथेच बसून राहणार
तहान भूक मेलीय माझी
तिला कधी कळणार
आज कसं वेगळंच वाटतंय
रोजच्या गर्दीपासून
अलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
लवकर ये ग
मी वाट पाहतोय…
आज कसं वेगळंच वाटतंय
तिला खूप miss करतोय......

My Dream (MaNi)आज मी तिला
खूप miss करतोय
कुठे हरवली काय
माहित आज मी
स्वतः स्वताशीच बोलतोय
जायचं तर सांगून तरी जायचं होत

अनोळखी चेहऱ्यात तिलाच शोधत बसलोय
आज मी तिला खूप miss करतोय
आली कि नुसती बडबड
आज जणू शांतता पसरलीय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
येईल या आशेवर
आज मी इथेच बसून राहणार
तहान भूक मेलीय माझी
तिला कधी कळणार
आज कसं वेगळंच वाटतंय
रोजच्या गर्दीपासून
अलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेली रे ही…..
तिला खूप miss करतोय
लवकर ये ग
मी वाट पाहतोय…
आज कसं वेगळंच वाटतंय
तिला खूप miss करतोय......

♥ Keep loving truly ♥

Photo: माझ्या आयुष्यातील

सर्वात खुशीचा दिवस

तो असेल जेव्हा तू

माझ्या मनात नाही......

पण माझ्या बाजूला असशील ♥ 

♥Keep loving truly ♥

==>तूटलेलं हृदय<==माझ्या आयुष्यातील

सर्वात खुशीचा दिवस

तो असेल जेव्हा तू

माझ्या मनात नाही......

पण माझ्या बाजूला असशील...

Jab tak hai jaan...

Teri aankhon ki namkeen mastiyaan Teri hansi ki beparwah gustakhiyan Teri zulfon ki leharati angdaiyan Nahi bhoolunga main

Jab tak hai jaan Jab tak hai jaan

Tera haath se haath chhodna Tera saayon se rukh modna Tera palat ke phir na dekhna Nahi maaf karunga main

खुप दिवसांनी ती दिसली.......!

खुप दिवसांनी ती दिसली.......!

आज............
आज खुप दिवसांनी ती दिसली,
तिला बघुन असे वाटले
जसे ती माझ्याशी
जन्मभरासाठीच रुसली,

जनु गुलाब या फुलाचे
प्रेमीँसाठी महत्वच मेले,
जेव्हा तिने माझ्याकडे बघुन
नबघीतल्या सारखे केले,

मित्रानसमोर चेह-यावर
खोटे हासु आनुण हसत राहीलो,
ति बघेन या आशेने
मागुण तिच्याचकङे बघत राहीलो,

शेवटी ती नजरेआड झाली
मन दुखावल आणि निराश झालो,
ओल्या पापन्या घेऊन
घाई - घाईने घरी आलो,

स्लँमबुक मधुन तिचा
जुना नंबर शोधला,
बंद असतांनाही
मुद्दाम फिरवला,

"नंबर मोजुद नही है"
अस उत्तर मिळत होत,
उत्तर एकतांना मात्र
माझ हृदय रळत होत.

तिला भेटण्याची प्रत्येक
आशाच मेली,
नंतर मग नशिबालाच
दोष दिली, कि

आपल्याच जिवनात का
असे प्रसंग घडतात,
आपन त्यांचावर कितीही
जिऊ ओतला तरी का
अस एकट्याला अर्ध्यावर
सोडुन जातात,

मन विचार करत असत
उत्तर मात्र का सापडत नाही,
कुठल्याही ख-या प्रेम करणा-याला
त्याच मनासारख प्रेम का
मिळत नाही.?

Believe me u never forgot me...

Believe me u never forgot me...

ती मी दिलेल्या सर्व आठवणी, पुसण्याचा प्रयत्न करतेय..
माझ्या पासुन खुप लांब, जाण्याचा प्रयत्न करतेय..!! ♥

पण मला माहीत आहे, ती मला मनातुन काढुचं शकत नाही..
कितीही प्रयत्न केले तरी, ती मला कधीचं विसरु शकत नाही..!! ♥

मला माहीत आहे, मी तीच्या डोळ्यात फक्त आश्रुंच दिलेय..
तीला आश्रुं देताना, मी पण खुप रडलोय..!! ♥

तीला मात्र हे कधीचं, मी समजुचं दिले नाही..
तीच्यावर माझे खुप प्रेम आहे, हे मी कधीचं जानवू दिले नाही..!! ♥

कारण मी असा मुद्दाम वागत होतो,तीला त्रास होऊ नये म्हणुन 

काळजी घेत होतो.. कारण मला माहीत आहे,...!! ♥

ती माझ्याशिवाय कधीचं राहू शकत नाही.. पण माझ्यामुळे तीला झालेला त्रास,
मी कधीचं पाहू शकत नाही..!! ♥

म्हणुन आजही मी तीच्यासाठी गप्प आहे, कारण तीच्यावर माझे निस्वार्थ निस्सम जिवापाड प्रेम आहे..!! ♥


अशीच यावी वेळ एकदा................

अशीच यावी वेळ एकदा................
अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना..
असे घडावे अवचीत काही तुझ्या समीप मी असताना..

अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानक..
जवळ नसावे चिट्टपाखरु केवळ तुझी नि माझी जवळीक..

संकोचाचे रेशीम पदडे हा हा म्हणता विरुन जावेत..
समय सरावा मंद गतीने अन् प्रितीचे सुर जुळावे..

मी मागावे तुझीयापाशी असे काहीसे निघताना..
उगीच करावे नको नको तु हवे हवेसे असताना..

शब्दावाचुन तुला कळावे गुज मनी या लपलेले..
मुक्तपणे तु उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले..

अपूर्ण प्रेम आपल…

अपूर्ण प्रेम आपल…

माझ प्रेम कधी कलाल नाही तुला,
म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,.....

मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर,

आणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर,

पण का कधी विचारल नाहीस मला,
माझ्या नकाराची भिती होती का तुला?

तुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल
दोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल,

आणि आता ते कायमच राहिल अपुर्णच.....
कारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच....

प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते....

Photo: नेहमीच आनंद मिळेल असे नाही.... कधी कधी दुख पण सोसावे लागते....
कितीही अहंकारी असाल तरीही....
प्रेमात मात्र
कधी ना कधी झुकावेच लागते....नेहमीच आनंद मिळेल असे नाही.... 
कधी कधी दुख पण सोसावे लागते....
कितीही अहंकारी असाल तरीही....
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते....

सांग ना कसं विसरू मी तुला...

श्वास आहेस तू माझा,
तुझ ऐकण्यासाठी तुला विसरीन ,
पण हृदयात असतो ना सहवास तुझा.
सांग ना कसं विसरू मी तुला.

... माझ्या अश्रूंनाही ठाऊक आहे मी किती भावूक आहे,
विसरायचा प्रयन्त केल्यावर पापण्या ओल्या करतात,
काहीतरी सांगतात ते मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

झोपेतही तुझीच आठवण येते,
सारख तुझंच नाव घेते,
तुझ्या स्वप्नात नेतात त्या मला.
सांग ना कसं विसरू मी तुला.

एक वेळ कविता करायचे सोडेन,
माझ्या कवितेच झाड तुझ्यासाठी मोडेन.
पण नाही विसरू शकत मी तुला,
सांग ना कसं विसरू मी तुला.

तुझ्या तो कोमल हाताचा स्पर्श,
मनात रुजून आहे कित्येक वर्ष.
कसा जाणार सहवास तुझा सांग मला,
सांग ना कसं विसरू मी तुला.....तुझा ......

मी तिच्यावर प्रेम केले तिला नाही जाणवले...

मी तिच्यावर प्रेम केले तिला नाही जाणवले
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले

बहुतेक समजली नसेल तिला माझ्या प्रेमाची किंमत
मलाही होत नव्हती तिला विचारण्याची हिम्मत
...
तिला नव्हतेच हृदय ती होती निर्दयी मला उशिरा उमजले
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले

देऊन गेलीस दुख: एवढे विरहाचे नभ साऱ्या आयुष्यावर झाकोळले
ती सोडून मजला जाताना माझे डोळे पाणावले
पवनपुत्र जकाते.

वाट पाहत होतो.....


ती असायेची माझी अन,
मी हि फक्त तिझाच असायेचो..
तिझ्या आनंदसाठी,
मी काहीही करायेचो... ती असायेची माझी
 जेव्हा आम्ही बागेत फिरायेचो..... हात घेऊन हात,
आम्ही झाडा खाली बसयेचो...अन नेहमी गप
असणाऱ्या तिझ्या बरोबर, मी खूप खूप बोलायेचो...
ती असायेची माझी जेव्हा,आम्ही lecture
मध्ये असायेचो, एका मेकांच्या बाजूला असून हि,
मी फळ्या कडे कमी, आणि तिझ्या कडे जास्त
पहायेचो... ती असायेची माझी जेव्हा,
आम्ही कॉलेज संपल्यावर हि,
रोज रोज घरी खोट बोलून भेटायेचो,
आणि नेहमीच्याच बागेत फिरायेचो.... अन फिरता फिरता, आमच्या भविष्याची स्वप्ने
रंगवयेचो... पण...अचानक एक दिवस, ती मला सोडून
गेली...
काळाचा नाही मला, मी काय घोर चूक केली...
बोलली नाही काही, फोन हि नाही केला...
मी केलेला फोने, तिने तो हि cut
केला... मग,एक दिवस भेटली मला, अन सांगू
 लागली, "शेवटच झालेल भांडण मला खूप
खटकलं...तुझा वागणं हि मला या वेळी नाही पटलं...
राहू नाही शकत मी आता तुझ्या बरोबर...
I'M sry, मी तुझं आयुष बरबाद केला...
मला एकट राहायेच्या आता, प्रेम
नाही करायेचा कोणावर..नोको त्या खडकाळ वाटा,विसरून
जा मला तू आता...bye n please tk cr of urself"
हे बोलून ती निघून गेली... त्या दिवशी पासून ती माझी नव्हती,
पण मी आजून हि तिझाच होतो, नेहमीच्या बागेत नेहमीच्याच
जागी बसून,
मी तिझी परत येण्याची वाट पाहत होतो....
मी तिझी परत येण्याची वाट पाहत होतो...

रागवू नकोस मला..

रागवू नकोस मला

Photo: आपले प्रेम होणे हे तर,
आधीच ठरलेले होते ....

उगाचच नाही त्या विधात्याने,
तुला मला भेटवले होते...♥
मनवता येणार नाही,

लपवू नकोस
मला ओळखता येणार नाही,

डोळ्यात पाणी नको आणूस
मला बघवणार नाही,

दूर जाऊ नकोस
मला जगता येणार नाही,

उदास होऊ नकोस
मला हसता येणार नाही,

हृदय तोडु नकोस
मला जोडता येणार नाही,

आठणीँन मध्ये छलु नकोस
मला सावरता येणार नाही,

साथ कधी सोडु नकोस मला
तुला कधी सोडता येणार नाही,

रूसवा धरु नकोस
मला शब्द सापडणार नाही,

एकटं मला सोडु नकोस
आपल असं मला कोणी नाही,

गुंतलेल हृदय मोडू नकोस
मला परत गुंतता येणार नाही,

तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही......
असं मी म्हणतं नाही

कारण....

तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणार नाही।

सांग ना मज वेड का लावले ….

गुणदोष ठेवा सावरुनी

द्या प्रेमभाव बहरूनी

सरते आयुष्य शेवटी

राही मनी प्रीत उरूनी ..

तुझासंग प्रीतीची पाऊले 

सांग ना मज वेड का लावले ….


काटेरी आठवण तरी 

मनी सदैव ती परी 

एकटा जीव हुंडाळी

नेत्री काळोख जरी ....

रवि नयनात मावळे

सांग ना मज वेड का लावले ….



मनी कळीही फुलली

तिथ रात दिन डुलली

वाट काढली त्यातुनि

जरी होती काट्यातुनि ……

तिथ प्रेमफुल फुलले

सांग ना मज वेड का लावले …. 


किती   तुझे बहाणे

माझ्या प्रीतीचे तराणे

गुलाबही लागला कराया

गुलाबी ओठाचे गाऱ्हाणे …

त्यालाही बेरंगी वाटले

सांग ना मज वेड का लावले ….


मज वेड का लावले ….

तुझासंग प्रीतीची पाऊले 
सांग ना मज वेड का लावले ….

माझ्या मित्रासाठी …. गेली ती उडत

पहिले तिच्यावर प्रेम करा …
मग रोज - रोज तिच्या विचारात झुरा
प्रपोज केल्यावर हो म्हणाव म्हणून
रोज तिच्या मागे पुढे  करा ….

प्रेमापुर्वी भरपूर पैसे खर्च करा
बाजीरावाच आपले वडील असा भास करा
प्रेम असून सुद्धा श्रीमंती चा खोत ध्यास धारा
उधारी करा अन बिनबोभाट व्याज भरा

खरे प्रेम असून सुद्धा हे सगळ का ?
फक्त ती तुला भेटवी म्हणूनच हि सर्कस ना
जस तस  करून तू तिला प्रपोज केलास
नशीबच खराब तुझ म्हणून होकारही आला

उधारीवर उधारी करत तू गेला
व्याज्याच्या फेऱ्यात आडकत गेलास
पैस्यांवर प्रेम करणारी ती ,,तुला कळलंच नाही
शेवटी खोटेपणा तुझ्या श्रीमंतीचा टिकला नाही
खरेपणा तिचा तरी तुला दिसला नाही …

काहीतरी सांगून मग भांडू ती लागली
ग्लासा मागे ग्लास तुझी आता दारूही वाढली
घर दार परिवार गेला तू विसरून …
मित्र आहोत आम्ही म्हणून घेतलं समजून

कर्ज फेडू पुन्हा तुला उभे करू …
फक्त एकदा बाहेर पड तिच्यामधू न
इतिहास तीच तुला कितीदा सांगितला
पण मित्र झालते कडू तुला तिचाच गोडवा वाटला

पैसे गेल्यावर तूझे  तिचा खरा रंग दिसला
आठ्व ते दिवस आठव ती वाणी
आता तरी सोड … गेली ती उडत
उज्वल भविष्याची हि मैत्रीची खात्री

मला न सांगता तू तिथे घेऊन चल ....


एक जागा बघ जिथे भावनांना स्थान असेल

एक जागा बघ जिथे प्रेम हे फक्त प्रेमासारख असेल

एक जागा बघ जिथे माणूस अन माणुसकी असेल

जाती-पाती अन बँक अकौंट वरती जिथे निर्णय नसेल

मला न सांगता तू तिथे घेऊन चल ....



एक जागा बघ जेथे सगळ काही सत्य असेल

एक जागा बघ जिथे सगळ्या विरुद्ध तुझा एक हात माझी हिम्मत असेल

एक जागा बघ जिथे तू माझी अन मी तुझा असेल 

समाज अन फ्यामिली ची कारणे देणार दुबळ जिथे प्रेम नसेल

मला न सांगता तू तिथे घेऊन चल....



एक जागा बघ जिथे कोणतच बंधन नसेल

एक जागा बघ जिथे  कोणतीच चूक प्रेमाहून मोठी नसेल

एक जागा बघ जिथे आपल्या प्रत्येक वेदनेचा मलम हा प्रीतीचा ओलावा असेल

सोबत येउन एकत्र राहताना कोणताही पाछ्तावा नसेल

मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...



एक जागा बघ जिथे राधा-कृष्णाहूनही आपल नातं महान असेल

जिथे अर्धांगिनी रुक्मिणी नसून प्रेमवेडी  राधाच असेल

कोणतेही कारण असो राधा सोडून रुक्मिणी जिथे वधू नसेल

विरहात जळणाऱ्या मीरेचीही जिथे कृष्णाला जाण असेल

मला तुझी अन तुला माझी कायम साथ असेल

मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...



मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...

मला न सांगता तू तिथे घेऊन चल ...

लवकर मला तिथे घेऊन चल .....

दूर गेलीस तरी तुझी आठवण मी नेहमी करत राहील ..

तू माझ्या पासून दूर गेलीस तरी तुझी आठवण मी नेहमी करत राहील ..

काय माहीत जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली परत भेट होईल ..

भेटशील कधी मला तर तुझ्याशी दोन शब्द बोलायला मी तयार राहील ..

विसरू नका मला कधीच तु माझी नसलीस तरी मी तुझाच राहील ..

तुझी वाट बघता बघता …


तुझी वाट बघता बघता …
रस्ता तेवढा संपला,
तू तर आलीच नाहीस …
पण अपघात मात्र घडला…
यायचंच नव्हत तुला …
हे मी समजून घ्यायला हवं होतं,
वेळ नसल्याचा तूझं कारण …
मला genuine वाटलं होतं…
तू सोबत असतीस ,
तर मला माझ्याही आधाराची गरज नव्हती,
तू फक्त सोबत असावी ,
एवढीच माझी इच्छा होती …
मी तुझी वेड्यासारखी वाट पाहत होतो…
हे मला आत्ता पटलं ,
तुला मात्र अजूनही …
माझं मन नाही कळलं …
वाट पाहून तुझी …
मला वाटतं आत्ता काही उपयोग नाही ….
पण या मनाला कोण समजावत बसणार …
ते माझं ऐकतच नाही ….

गरज म्हणून'नातं'कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं'म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक'नातं'जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...