Monday, 17 June 2013

अशीच यावी वेळ एकदा................

अशीच यावी वेळ एकदा................
अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना..
असे घडावे अवचीत काही तुझ्या समीप मी असताना..

अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानक..
जवळ नसावे चिट्टपाखरु केवळ तुझी नि माझी जवळीक..

संकोचाचे रेशीम पदडे हा हा म्हणता विरुन जावेत..
समय सरावा मंद गतीने अन् प्रितीचे सुर जुळावे..

मी मागावे तुझीयापाशी असे काहीसे निघताना..
उगीच करावे नको नको तु हवे हवेसे असताना..

शब्दावाचुन तुला कळावे गुज मनी या लपलेले..
मुक्तपणे तु उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले..

No comments:

Post a Comment

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...