Tuesday, 29 May 2012

सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला

सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस
जेव्हा तू माझीच गाणी बडबडतोस
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला

मलाही खरेच आवडतेस तू
कसे सांगू आज तुला
शब्दच मला मिळत नाहीत

प्रेमात आपल्या मी तुला देईल एक आशा
करत राहील मी प्रेम
न देणार खोटी अमिषा
भरवसा तुझा हीच माझी दौलत आहे

फक्त तू साथ दे मला
आयुष्यभर आठवण राहील
एवढे प्रेम देईल मी तुला..

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला
आज असे काय झाले तुला
तू निघून जा म्हणते आहेस मला

एवढा विश्वास खरेच नाही तुला
कदाचित माझेच प्रेम अधुरे वाटले तुला ..
आपले प्रेम होईल पूर्ण होईल नक्की
तू साथ दे मला

माहित आहे तू आजही त्या झाडावरच प्रेम अधिक करतेस
ज्या सावली मध्ये तू राहिलीस
पण..??
एकदा ये जवळ मी ही
प्रेमाची बाहुली बनून ठेवेल तुला
फुलांच्या छायेत ठेवेल तुला ..

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला ..

(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]

माझी भेट फेसबुकवर झाली...

माझी भेट फेसबुकवर झाली...!!

तिच्यासाठीच मी  online   यायला लागलो
कधी कधी नव्हे तो आता दिवसभर  बसायला लागलो
माझ्या post  ला ती  खूप कमेंट्स करायची
likes  करून  मला  जवळचे ती मानायची ....

१ वर्षाने  कुठे फोन वर बोलू  लागलो
कुणाशी नव्हे ते  आता तिच्याशीच बोलू लागलो
ती आता मला जवळची वाटू लागली
तिचेच गाणे आता माझ्या मनात हि येऊ लागले
मी कामात असायचो
पण तिला कारमायचे नाही....


थोड्या  थोड्या वेळात मला फोन सारखी करायची
कसा आहेस म्हणून मला ती बोलत बस म्हणायची
माझे प्रत्येक  शब्दावर ती मनापासून हसायची
कधी मानस लागले  तर ती  हुंदक्यात रडायची
मग  तिला  लांबूनच  जवळ घ्यायचो
उगी उगी म्हणत  तिला  तू माझी  बेस्ट फ्रेंड   म्हणायचो ....

रडताना खरच ती मला हि रडवायची
रडायची ती अन  श्वास   माझा फुलवायची

तिच्या फोन ची  मलाही  सवयच  होती झाली
फोनशिवाय तिच्या  आता झोपच लागत  नव्हती
तिची  मला जणू आता  सवयच लागली होती
भेट तिची माझी होईल अशी  मला वाटलेही नव्हते
माझी होईल  ती  स्वप्नातही  नव्हते

दोन वर्षे  झाली  तेव्हा भेट आमची झाली
तिला मला पाहून  सारे प्रेमीच समजू लागले
माझी मैत्रीण मानून कधी  कमी केली नाही

मग  काही  दिवसात ती वेगळी  वागू लागली
तिची एक एक सवय मी जणू लागलो  होतो
तिचे असे वागणे मला जखमी केले होते
मग वाटले तिला काय म्हणू मी
तिनेच  मला आता  दूर  केले  होते

मी हि  गेलो  दूर  तिला
हसत  ठेवायला कुणासोबत हि रहा
पण  डोळ्यात  अश्रू नकोत म्हणायला

तिची  माझी मैत्री  आता संपून गेली होती
माझ्याही मनात आता अमावस्या झाली होती
काळोखच काळोख माझ्या मनातही झाला

काही कशाची मैत्री होती
पण जवळचीच वाटली
थोड्याच वेळात कधी  नव्हे ते  सुख  मी बघितले ..

तू  माझी मैत्रीण होती
मी आज हि  तेच मानतो
तुझे  प्रेत्यक शब्द माझ्या  हृदयात आजही  साठवतो ..

तुझ्या  येण्याच्या आशा आता नाहीशा झाल्यात
तुझ्यचं  साठी  मी कित्येक रात्री जागल्यात...

जमलेच तर  ये  मी आजही  वाट बघतोय
फुल समजून मी दगडालाच  बोलावतोय ....

कसे होते ते क्षण ..

कसे होते ते क्षण ..?

कसे होते ते क्षण ..?
तरल अनुभव ..
नाजूक क्षण..!
फिरून फिरून डोकावून
हरवून जातेय माझे मन
ते अलवार नाजूक तरल क्षण

खूप छान
मस्त देखणी
छान साडी
साधी साधी
नाकी डोळी
सुंदर सुंदर
विसरून गेले
ते मी पण

त्या नजरेचा
स्पर्श मुलायम ...
हलके हलके
बावरून मन
आभाळातील शुभ्र ढग
मनास पिंजून ...
मनावरून गेले फिरून
ते अलवार नाजूक तरल क्षण

किती काळ उलटून गेला
छान दिवस हरवून गेले
निळ्या निळ्या आठवणीचे
अजून मला स्वप्न पडते
अजून मन धुंदावून...
आठवून मन व्याकुळ ..होते .
ते अलवार नाजूक तरल क्षण .......!!

अशीच ती मला प्रेयसी ही मिळावी ....

अशीच  ती  मला प्रेयसी ही मिळावी ....

मला हि वाटत होतं माझेही कुणी असावी
हातात हाथ धरून सोबत चल म्हणावे

कुठे एकटे पडलो  तर  साथ तिने द्यावी
पैसा अडका नको मला एक मैत्रीण खास असावी
जिच्या जवळ मन हे मोकळे  होऊन जावे
दाटलंय मनात  आभाळ दुखांचे
तो पाउस अश्रू बनून यावे

मलाही वाटतं माझी हि कुणी असावी
माझ्या मनात काय ते पटकन ओळखणारी ती असावी
अशीच  ती  मला प्रेयसी ही मिळावी ....

प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते......

 प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते......

ह्या एकाच ओळीने मनात प्रश्नांचे काहूर माजते
आयुष्यात परत मिळणारे प्रेम कधीच का खरे नसते???

तू माझ्यावर केलेले प्रेम खूप निस्वार्थी होते
मनाला हळुवार स्पर्शिणारे जणू मोरपीस होते

मग खरच का तुझे प्रेम माझ्यासाठीशेवटचे होते ???

मैत्रीच्याही पुढे पाऊल टाकण्यास मी होते नेहमीच घाबरले
तू पुढे केलेला प्रेमाचा हात हाती घेण्यास सदैव नाही म्हंटले
तू माझ्या मनातील भाव समजून घेशील याचीच वाट पाहत राहिले..

तुझे प्रेम माझ्यासाठी खरच खूप मौल्यवान होते
तुझ्या हितापाई तुझ्यापासून दुरावण्याच्या प्रयत्नात मी होते
पण खरच रे वेड्या मी हि तुझ्यावरतेवढच प्रेम करत होते

मग खरच का रे तुझे प्रेम माझ्यासाठी अखेरचे होते ???

नव आयुष्याच्या सुरवातीस नव प्रेमाची चाहूल असेल
माहित आहे कदाचित ते प्रेम तुझ्या एवढे अनमोल नसेल
पण मग काय ते प्रेम
माझ्यासाठी कधीच खर नसेल???

खरच का रे तुझ प्रेम माझ्यासाठी अखेरचे असेल????

(¯`♥´¯)
.`•.¸.•´ (¯`♥´¯)
******.`•.¸.•´ ( ¯`♥´¯).
************.`• .¸.•´(¯`♥´¯)
********************.`•.¸.:

होऊनी ध्रुवतारा आहेस हृदयात तू......

असो चंद्रप्रकाश, कधी अंधार सारा
असो सावली, कधी उन्हाचा पसारा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा


                     असो मी एकटा, कधी सोबती दुसरा
                     असो वाट पाहत, कधी स्वप्न साजरा
                     आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा


असो क्षण सुखाचा, कधी दुख: बोचरा
असो बेचिराख मी, कधी आसमंत सारा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा

प्रेम केल होत ग तुझ्यावर ...........

प्रेम केल होत ग तुझ्यावर ...........!

खुप प्रेम केल होत ग तुझ्यावर
पण नाही सांगु शकलो मी तुला,
कदाचित नाही म्‍हणाली असती
याची भिती वाटत होती मला.

कॉलेजमध्‍ये पहील्‍याचदिवशी तु
माझ्याकडे बघुन लाजुन हसली होतीस,
बस त्‍याच क्षणापासुन तु
मला आवडली होतीस,

तुझ लंक्ष नसतांना
तुझ्याचकडे पहात बसायचो,
तुने बघीतल्‍यावर मात्र
नजर चोरायचो.

तु येण्‍याच्‍या वेळेस
वर्गाच्‍या दरवाज्‍यात उभा रहायचो,
आणि तु आल्‍यावर मी
मुद्दामच तुला चिडवायचो.

एक वेळेस माझ्याकडुन
तुझा ड्रेसही खराब झाला,
पण अस वागण्‍याचा तुला माझा
कधीच राग नाही आला.

तुझ्याशी बोलतांना वाटल
तुलाही माझ्याशी प्रेम झाल,
म्‍हणुन आदल्‍याच दिवशी
मित्रांना चोरुन तुझ्यासाठी गुलाब आणल.

गुलाब देण्‍याअगोदर
मनात प्रश्‍न उठले असे काही,
तुझा माझ्याकडे बघण्‍याचा फक्‍त
मैत्रीचा दृष्‍टीकोणतर नाही.

मग काय.....
आणलेल्‍या फुलाकडे
दुःखी मनाने पाहीले,
उचलुन त्‍या गुलाबाला
पुस्‍तकात ठेवले.

शेवटी....
शेवटी तो कॉलेजचा
शेवटचा दिवस आला,
तुला माझ्यापासून कायमचे दूर घेऊन गेला.

त्‍या दिवशी तुझ्या डोळ्यातही
पाणी आले होते,
माझ्यावरचे प्रेम मि
नकळत तुझ्या डोळ्यात पाहीले होते.

आज तुझ्यापासून दुर व्‍हायला
मोजुन दीड वर्ष होण्‍यात आले,
पण असे वाटते हे सर्व...
काल परवाज घडाले.

कदाचीत...
कदाचीत तुही माझी
आठवण काढत असशील,
आणि माझ्या आठवणीत
अश्रृ गाळत बसशील.

आज मी दीड वर्षांनी ते
पुस्‍तकातले सुकलेले गुलाब पाहतो हे,
आणि पाहतांना त्‍या गुलाबावर
अश्रृंचा अभिशेक करतो हे.

या भित्र्या मनाला आज
खुप कोसतो हे,
मि आज पुन्‍हा तुझी
माफी मागतो हे.

माफ कर मला....
नाही सांगु शकलो मी तुला,
भिती वाटत होती त्‍या
एका "नाही" ची मला.

कस सांगीतल असत ग तुला,
मैत्रीचा प्रश्‍न
पडला होता मला.

होईल तर माफ कर
खरच....
खुप प्रेम केल होत ग तुझ्यावर
पण नाही सांगु शकलो मी तुला,
कदाचित नाही म्‍हणाली असती
याची भिती वाटत होती मला...........

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...