Tuesday, 29 May 2012

सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला

सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस
जेव्हा तू माझीच गाणी बडबडतोस
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला

मलाही खरेच आवडतेस तू
कसे सांगू आज तुला
शब्दच मला मिळत नाहीत

प्रेमात आपल्या मी तुला देईल एक आशा
करत राहील मी प्रेम
न देणार खोटी अमिषा
भरवसा तुझा हीच माझी दौलत आहे

फक्त तू साथ दे मला
आयुष्यभर आठवण राहील
एवढे प्रेम देईल मी तुला..

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला
आज असे काय झाले तुला
तू निघून जा म्हणते आहेस मला

एवढा विश्वास खरेच नाही तुला
कदाचित माझेच प्रेम अधुरे वाटले तुला ..
आपले प्रेम होईल पूर्ण होईल नक्की
तू साथ दे मला

माहित आहे तू आजही त्या झाडावरच प्रेम अधिक करतेस
ज्या सावली मध्ये तू राहिलीस
पण..??
एकदा ये जवळ मी ही
प्रेमाची बाहुली बनून ठेवेल तुला
फुलांच्या छायेत ठेवेल तुला ..

काल तू म्हणालीस तू खूप आवडतोस
सांग ना प्रिये खरच साथ देशील ना मला ..

(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]

माझी भेट फेसबुकवर झाली...

माझी भेट फेसबुकवर झाली...!!

तिच्यासाठीच मी  online   यायला लागलो
कधी कधी नव्हे तो आता दिवसभर  बसायला लागलो
माझ्या post  ला ती  खूप कमेंट्स करायची
likes  करून  मला  जवळचे ती मानायची ....

१ वर्षाने  कुठे फोन वर बोलू  लागलो
कुणाशी नव्हे ते  आता तिच्याशीच बोलू लागलो
ती आता मला जवळची वाटू लागली
तिचेच गाणे आता माझ्या मनात हि येऊ लागले
मी कामात असायचो
पण तिला कारमायचे नाही....


थोड्या  थोड्या वेळात मला फोन सारखी करायची
कसा आहेस म्हणून मला ती बोलत बस म्हणायची
माझे प्रत्येक  शब्दावर ती मनापासून हसायची
कधी मानस लागले  तर ती  हुंदक्यात रडायची
मग  तिला  लांबूनच  जवळ घ्यायचो
उगी उगी म्हणत  तिला  तू माझी  बेस्ट फ्रेंड   म्हणायचो ....

रडताना खरच ती मला हि रडवायची
रडायची ती अन  श्वास   माझा फुलवायची

तिच्या फोन ची  मलाही  सवयच  होती झाली
फोनशिवाय तिच्या  आता झोपच लागत  नव्हती
तिची  मला जणू आता  सवयच लागली होती
भेट तिची माझी होईल अशी  मला वाटलेही नव्हते
माझी होईल  ती  स्वप्नातही  नव्हते

दोन वर्षे  झाली  तेव्हा भेट आमची झाली
तिला मला पाहून  सारे प्रेमीच समजू लागले
माझी मैत्रीण मानून कधी  कमी केली नाही

मग  काही  दिवसात ती वेगळी  वागू लागली
तिची एक एक सवय मी जणू लागलो  होतो
तिचे असे वागणे मला जखमी केले होते
मग वाटले तिला काय म्हणू मी
तिनेच  मला आता  दूर  केले  होते

मी हि  गेलो  दूर  तिला
हसत  ठेवायला कुणासोबत हि रहा
पण  डोळ्यात  अश्रू नकोत म्हणायला

तिची  माझी मैत्री  आता संपून गेली होती
माझ्याही मनात आता अमावस्या झाली होती
काळोखच काळोख माझ्या मनातही झाला

काही कशाची मैत्री होती
पण जवळचीच वाटली
थोड्याच वेळात कधी  नव्हे ते  सुख  मी बघितले ..

तू  माझी मैत्रीण होती
मी आज हि  तेच मानतो
तुझे  प्रेत्यक शब्द माझ्या  हृदयात आजही  साठवतो ..

तुझ्या  येण्याच्या आशा आता नाहीशा झाल्यात
तुझ्यचं  साठी  मी कित्येक रात्री जागल्यात...

जमलेच तर  ये  मी आजही  वाट बघतोय
फुल समजून मी दगडालाच  बोलावतोय ....

कसे होते ते क्षण ..

कसे होते ते क्षण ..?

कसे होते ते क्षण ..?
तरल अनुभव ..
नाजूक क्षण..!
फिरून फिरून डोकावून
हरवून जातेय माझे मन
ते अलवार नाजूक तरल क्षण

खूप छान
मस्त देखणी
छान साडी
साधी साधी
नाकी डोळी
सुंदर सुंदर
विसरून गेले
ते मी पण

त्या नजरेचा
स्पर्श मुलायम ...
हलके हलके
बावरून मन
आभाळातील शुभ्र ढग
मनास पिंजून ...
मनावरून गेले फिरून
ते अलवार नाजूक तरल क्षण

किती काळ उलटून गेला
छान दिवस हरवून गेले
निळ्या निळ्या आठवणीचे
अजून मला स्वप्न पडते
अजून मन धुंदावून...
आठवून मन व्याकुळ ..होते .
ते अलवार नाजूक तरल क्षण .......!!

अशीच ती मला प्रेयसी ही मिळावी ....

अशीच  ती  मला प्रेयसी ही मिळावी ....

मला हि वाटत होतं माझेही कुणी असावी
हातात हाथ धरून सोबत चल म्हणावे

कुठे एकटे पडलो  तर  साथ तिने द्यावी
पैसा अडका नको मला एक मैत्रीण खास असावी
जिच्या जवळ मन हे मोकळे  होऊन जावे
दाटलंय मनात  आभाळ दुखांचे
तो पाउस अश्रू बनून यावे

मलाही वाटतं माझी हि कुणी असावी
माझ्या मनात काय ते पटकन ओळखणारी ती असावी
अशीच  ती  मला प्रेयसी ही मिळावी ....

प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते......

 प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते......

ह्या एकाच ओळीने मनात प्रश्नांचे काहूर माजते
आयुष्यात परत मिळणारे प्रेम कधीच का खरे नसते???

तू माझ्यावर केलेले प्रेम खूप निस्वार्थी होते
मनाला हळुवार स्पर्शिणारे जणू मोरपीस होते

मग खरच का तुझे प्रेम माझ्यासाठीशेवटचे होते ???

मैत्रीच्याही पुढे पाऊल टाकण्यास मी होते नेहमीच घाबरले
तू पुढे केलेला प्रेमाचा हात हाती घेण्यास सदैव नाही म्हंटले
तू माझ्या मनातील भाव समजून घेशील याचीच वाट पाहत राहिले..

तुझे प्रेम माझ्यासाठी खरच खूप मौल्यवान होते
तुझ्या हितापाई तुझ्यापासून दुरावण्याच्या प्रयत्नात मी होते
पण खरच रे वेड्या मी हि तुझ्यावरतेवढच प्रेम करत होते

मग खरच का रे तुझे प्रेम माझ्यासाठी अखेरचे होते ???

नव आयुष्याच्या सुरवातीस नव प्रेमाची चाहूल असेल
माहित आहे कदाचित ते प्रेम तुझ्या एवढे अनमोल नसेल
पण मग काय ते प्रेम
माझ्यासाठी कधीच खर नसेल???

खरच का रे तुझ प्रेम माझ्यासाठी अखेरचे असेल????

(¯`♥´¯)
.`•.¸.•´ (¯`♥´¯)
******.`•.¸.•´ ( ¯`♥´¯).
************.`• .¸.•´(¯`♥´¯)
********************.`•.¸.:

होऊनी ध्रुवतारा आहेस हृदयात तू......

असो चंद्रप्रकाश, कधी अंधार सारा
असो सावली, कधी उन्हाचा पसारा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा


                     असो मी एकटा, कधी सोबती दुसरा
                     असो वाट पाहत, कधी स्वप्न साजरा
                     आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा


असो क्षण सुखाचा, कधी दुख: बोचरा
असो बेचिराख मी, कधी आसमंत सारा
आहेस हृदयात तू, होऊनी ध्रुवतारा

प्रेम केल होत ग तुझ्यावर ...........

प्रेम केल होत ग तुझ्यावर ...........!

खुप प्रेम केल होत ग तुझ्यावर
पण नाही सांगु शकलो मी तुला,
कदाचित नाही म्‍हणाली असती
याची भिती वाटत होती मला.

कॉलेजमध्‍ये पहील्‍याचदिवशी तु
माझ्याकडे बघुन लाजुन हसली होतीस,
बस त्‍याच क्षणापासुन तु
मला आवडली होतीस,

तुझ लंक्ष नसतांना
तुझ्याचकडे पहात बसायचो,
तुने बघीतल्‍यावर मात्र
नजर चोरायचो.

तु येण्‍याच्‍या वेळेस
वर्गाच्‍या दरवाज्‍यात उभा रहायचो,
आणि तु आल्‍यावर मी
मुद्दामच तुला चिडवायचो.

एक वेळेस माझ्याकडुन
तुझा ड्रेसही खराब झाला,
पण अस वागण्‍याचा तुला माझा
कधीच राग नाही आला.

तुझ्याशी बोलतांना वाटल
तुलाही माझ्याशी प्रेम झाल,
म्‍हणुन आदल्‍याच दिवशी
मित्रांना चोरुन तुझ्यासाठी गुलाब आणल.

गुलाब देण्‍याअगोदर
मनात प्रश्‍न उठले असे काही,
तुझा माझ्याकडे बघण्‍याचा फक्‍त
मैत्रीचा दृष्‍टीकोणतर नाही.

मग काय.....
आणलेल्‍या फुलाकडे
दुःखी मनाने पाहीले,
उचलुन त्‍या गुलाबाला
पुस्‍तकात ठेवले.

शेवटी....
शेवटी तो कॉलेजचा
शेवटचा दिवस आला,
तुला माझ्यापासून कायमचे दूर घेऊन गेला.

त्‍या दिवशी तुझ्या डोळ्यातही
पाणी आले होते,
माझ्यावरचे प्रेम मि
नकळत तुझ्या डोळ्यात पाहीले होते.

आज तुझ्यापासून दुर व्‍हायला
मोजुन दीड वर्ष होण्‍यात आले,
पण असे वाटते हे सर्व...
काल परवाज घडाले.

कदाचीत...
कदाचीत तुही माझी
आठवण काढत असशील,
आणि माझ्या आठवणीत
अश्रृ गाळत बसशील.

आज मी दीड वर्षांनी ते
पुस्‍तकातले सुकलेले गुलाब पाहतो हे,
आणि पाहतांना त्‍या गुलाबावर
अश्रृंचा अभिशेक करतो हे.

या भित्र्या मनाला आज
खुप कोसतो हे,
मि आज पुन्‍हा तुझी
माफी मागतो हे.

माफ कर मला....
नाही सांगु शकलो मी तुला,
भिती वाटत होती त्‍या
एका "नाही" ची मला.

कस सांगीतल असत ग तुला,
मैत्रीचा प्रश्‍न
पडला होता मला.

होईल तर माफ कर
खरच....
खुप प्रेम केल होत ग तुझ्यावर
पण नाही सांगु शकलो मी तुला,
कदाचित नाही म्‍हणाली असती
याची भिती वाटत होती मला...........

म्‍हणायचीस तुच ना.....

म्‍हणायचीस तुच  ना.....



तुच म्‍हणायचीस ना
की,
मला तुझ्यावीना करमत नाही रे,
तुझ्यावीना एक क्षणही
सुखचा जात नाही रे.

माझ्या ओठांवर
तुच का असतोस,
आणि माझ्या स्‍वप्‍नातही
तुच का रे दीसतोस.

मी तुझ्या प्रश्‍नांनवर
मनातल्‍या मनात हसायचो,
उत्‍तरात तुला
'हेच ते "प्रेम"'
असे सांगायचो.

माझे उत्‍तर एकूण तु
मस्‍त लाजायचीस,
नंतर तो लाजलेला चेहरा
स्‍वताच्‍या हाताने झाकायचीस.

तुझी ती अदा
खुपच मनमोहक असायची,
त्‍यातल्‍या त्‍यात तु मला आनखी
वेडाही म्‍हणायचीस.

पण.....
पण तुला माझा असा
कुठला राग आला हे,
की
तुझ्यासाठी हा वेडा
एकदमच परका झाला हे.

तुझ्याचसाठी हसायचा,
तुझ्याचसाठी रडायचा,
हाच तो चेहरा ना ग
जो तुला स्‍वप्‍नात दीसायचा.

मग माझ्याशी आता तु
अशी का ग वागतेस,
मी दीसल्‍यावर अशी
नजर का फिरवतेस.
आता असे का ग......

माझ्यासाठी तुझ्या मनात
इतका राग का आहे,
का मी खरच
इतका वाईट आहे.

जाता जाता या वेड्यावर
एक उपकार करशिल का,
मला तुला काही  सांगायच हे
एकदाच मला भेट‍शील का.

फक्‍त.....
फक्‍त एकदाच भेटून जा,
मला माझी चुक नको
शिंक्षा तर सांगुन जा.

नंतर मग....
तुझ्या ओठांवर काय, तर
तुझ्या स्‍वप्‍नातही येनार नाही,
आणि तु शोधशील तरी हा वेडा तुला
ह्या जगातही सापडणार नाही.
तु शोधशील तरी हा वेडा तुला
ह्या जगातही सापडणार नाही.

होतीस तू सोबत म्हणून......

तू सोबत होतीस म्हणून..!!

मला एकटे कधीच वाटलं नाही

तू सोबत होतीस म्हणून दू:खात कधी भिजलो नाही

दूर वादळे दिसताना  मी घाबरलो नाही
त्यास कधी सापडलो नाही

तू सोबत होतीस म्हणून....!! आयूष्याच्या वाटेत मी कधी डगमगलो नाही

एकटयाचे जिवन होते न कूणी सोबत होते

न कूणी ओळखीचे तू भेटलीस

अन....??

ओळख मज मिळाली

नव्या जिवनाची पहाट मज मिळाली

तू सोबत होतीस म्हणून..!!

चांदण्यांना पाहताना  वाटायचे
माझेही कूणी असावे

लाख चांदण्या आहेत येथे
मग मलाच का एकटेपण मिळावे..?

तूटणारया तारयाकडे ही मागून पाहीले
मंदिरात ही साकळे घातले

पण....

नशिबात जे तेच मिळायाचे होते

तू सोबत होतीस म्हणून
त्या फूलासही सूगंध आहे

लपून छपून तो भृंगाही त्याच भेटत आहे


प्रेमात भेटणारं सूख तेही चाखत आहे....

सोबत रहा अशीच सोबत आयुष्यभर
स्पंदने ही काळजास तूझेच गीत ऐकवीत आहे.....

तू सोबत होतीस म्हणून....!!
-

ती कधी बोललीच नव्हती पण मी ऐकत आलो......

ती कधी बोललीच नव्हती पण मी ऐकत आलो......

ती कधी बोलली नाही
पण मी ऐकत आलो,
ती कधी तशी नव्हती
पण मी समजत आलो.

ती फक्त माझ्याशी मैत्री
म्हाणुन गोड बोलायची,
 मी कुठेही दीसलो की
मला पाहुन गालात हसायची.

झाला मला गैर समज
तीचे प्रेम असल्याचा,
कधीही सुगावा लागला नाही
असे काही नसल्याचा.

तीला हे वीचारायला
मला नाही कधी जमले,
खुप हीम्मत करून
शेवटी मी तीला वीचारले.

मी काही पण बोलतोय
असे बोलुन तीने ते नाकारले,

खरच ती कधी बोललीच नव्हती
पण मी ऐकत आलो,
ती कधी तशी नव्हतीच
पण मी समजत ओलो....

कधीतरी साद तु देशील.....

कधीतरी साद तु देशील.....

एक साधा सुधा कवी
म्हाणून ओळख माझी नवी,
तुझ्यावर कवीता करून
आता भरली माझी वही.

तुझे ते हासु पाहून
डोळ्यांच्या पापण्या लवलवतात,
पाहतच राहील्यावर अपसुक
मला त्यावर कवीता सुचतात.

तुझ्यावर कवीता करताना
शब्द पावसा सारखे पडतात,
मी फक्त त्याना रचना देतो
ते शब्द आपोआप जोडतात.

कवीता लीहीताना तुझ्या
मनातले जाणु पाहतो,
तुला जे आवडेल असच
मी तुझ्यावर लीहीतो.

तु माझ्या कवीतेला
कधीही साद देत नाही,
असे असुनही मी कधी
नीराश होत नाही.

तुझ्या त्या नाकारण्याने
मी कधीही दुःखी नसतो,
कारण त्यातुनच तर मी
माझा कवीतेचा छंद जोपासतो.

माहीत असते मला
तु मझी नक्की होशील,
माझ्या या ओसाड कवीतेला
कधीतरी साद तु देशील.....

आपण ते दाखवू शकत नाही......

आपण ते दाखवू शकत नाही......

खूप अवघड जात जीवन जगणे                                      
जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम असत पण
आपण ते दाखवू शकत नाही......

मनात खूप असत कि तो/ती आपल्याला
भेटावे पण,
काही कारणांमुळे मनातील गोष्टी मनातच
ठेवाव्या लागतात.
अन खूप अवघड जात जीवन जगणे
जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम असत पण
आपण ते दाखवू शकत नाही......

काही कारण नसताना त्याच्याशी/तिच्याशी
बोलावस वाटत, उगाच इकडचे तिकडचे
विषय काढून बोलण्याचा प्रयत्न करतात
पण मन आवर म्हणून स्वतःलाच समजावतात.
अन खूप अवघड जात जीवन जगणे
जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम असत पण
आपण ते दाखवू शकत नाही......

मनातून तर त्याला/तिला आपल् सर्वस्व
मानलेल असत,पण ओठावर मात्र मी
असा विचार करत नाही हेच उत्तर असत.
अन खूप अवघड जात जीवन जगणे
जेव्हा आपल्याला कोणावर प्रेम असत पण
आपण ते दाखवू शकत नाही......

जशी पुर्वी होती.....

जशी पुर्वी होती.....

आजही ती तशीच आहे,
जशी पुर्वी होती.
आजही माझ्यात प्रेमाची
भावना आहे,
जशी पुर्वी होती.
हीम्मत नाही मला तीला
हे वीचारण्याची.
ती ही प्रेम करत असणार
पण भीती वाटते,
तीचा नकार ऐकण्यची.
म्हणुन मी आता ती
दीसल्यावर नजर चुकवतो.
तीच्या पासुन दुर गेल्यावर
स्वःतावरच रागावतो.

आणी मोकळा वेळ मीळाल्यस
मग तीच्यावरच कवीता
सुचवतो......

भावनांची गर्दी....

भावनांची गर्दी....


थेंब  गालावरून  निथळे  खांद्यावरी,
त्या  नितळ  थेंबात  भिजू  दे.
केस  ओले  तुझे,  जीव  नव्याने  रुजे,
आग  या  मनाची  विझू  दे.
हा  देह  आगीचा शांत  कर  चुम्बुनी,
आणखी  नको  लाउस  आग  पाहून  लांबुनी.
स्वर्ग  सुख  तोकडे, तू  जवळी  असता  लाडके,
मांडीवर  शांत  तुझ्या  निजू  दे.

माझी  वाट दूरची, दूरच्या  गावची,
थांबलो  मी  जरा  विश्रांती  घ्यायला,
खूप  काही  इथून  न्यायचे  मला  जरी,
पाहुनी  मी  तुला  लागलो  सर्वस्व द्यायला
एक  हळुवार  श्वास  टाक  माझ्यावरी,
अलवार  पाऊल  ठेव  माझ्या घरी,
घेऊ  मिटुनी  सारी  कवाडे  दाराची,
घेऊ  उघडून  कवाडे  अंतरीची,
देह  माझा  कधीतरी  घे  बाहोत  लपेटून,
देहास  तुझ्या  मिठीत  सजू  दे.

रात्रभर  बोलू  दोघे  निवांत,
जागवू  रात्र  ती,
दुरावा  क्षणाचा  नको,
विसरू  भान  अंगाचेही,
शुद्ध  भाव  पवित्र  मिलन,
होऊ  दे  साजणी,
हात  दे  हातामध्ये  तू  जरा  लाजुनी,
अधिकार  कसलाही  नको  कुणावरी,
छाप  विश्वासाची  मनावरी  उमटू  दे.

तू  जेव्हा  लागतेस काही  बोलायला,
शब्द  हि  माझे  लागती  हरवायला,
पाहता  पाहता वेळ  जाई  निघून,
कळेना  काही  मला  काय लागे  व्हायला.
जीभ  होते  जड, बोलणे अवघड,
स्वतःला  मांडण्याची  सुरु  असते  धडपड.
तू  काय  समाजत  असशील मला,
वेडपट  कि घमेंडी  कुणी,
काय  सांगू  किती  बोलतो  तुझ्याशीच,
मी नेहमी  माझ्या  मनी.
सांगता  येईना, तुलाही  समजेना कसे,
बोल  माझ्या मनीचे  मनी तुझ्या  उमटू  दे.

रम्य  कांती  तुझी,  गौर  वर्ण  तुझा,
नितळ  काया, शुद्ध  माया तुझी,
तुला  काय  ठाऊक  असेल,
कि कुणी  वेडा जपतो  तुझी  छाया  मनी.
हि  भीती  वाटते  राग  येईल  तुला,
तुझे  स्वच्छ  वागणे , माझी  चोरटी नजर.
दाखवतो  वागणे  वेगळे  तुला,
पण  रात्री कवितेत माझ्या  तू असतेस  हजर.
नाही  भाव  माझाही खोटा  असेल  कधी,
पण  प्रेम  माझे  तुझ्यावरी सांगता  येईना,
वाटे  खूपच  भीती होणार्या  परिणामाची,
म्हणुनी  जे  आहे  आता  ते  तसेच  राहू  दे.

एक  ना  एक  दिवस  तुला  जायचेच  दूर,
तो  दिवस अखेर  आला  आहे जवळ,
तू  जाशील तेव्हा  असेल का  माझी  आठवण  तुला,
पण  माझ्या  उरी  उरेल  एक  हळवासा  वळ.
प्रयत्न  नक्की  करेन  विसरण्याचा  तुला,
पण  जालीम  तुझा  स्पर्श  तो  खट्याळ  किती,
अजुनी  सुद्धा  तो  सहजच  स्पर्श  मला,
तुला  आठवत  ठेवण्याची  देतो  भीती.
एकदा  एके  दिवस  काही  क्षण  माझ्यासवे,
  दे  तुझे  अन  मला  आयुष्यभर गीत तुझे  गाऊ  दे.

ते पुन्हा होऊच शकत नाही ..

ते  पुन्हा होऊच शकत नाही ..!!


आता होऊच  शकत नाही
 काल ची रात्र  पुन्हा  येऊ शकत  नाही

 गेलेली  वेळ  पुन्हा येऊ शकत नाही
 लुकलुकणारे  तारे वाट पाहत थांबू शकत नाही

 जेवढा विश्वास  मी केला  तिच्यावर
 तो पुन्हा आता करु शकत नाही

 वादळाचा  सामना  केला  हि असता  तुझ्यासोबत
 पण  मी  वादळात  एकटाच  उभा राहू शकत नाही

 कोरीच राहिली  रोजनिशी  त्यात शब्दच उतरले नाही
 लेखणीच  रुसून  बसली  जी आता कधीच  लिहू शकत नाही

 प्रेम खूप  केले  तिच्यावर
 आता  कुणावर करूच  शकत नाही

 खूप  काही मनात आता  ते  पुन्हा होऊच शकत नाही ..!!
 - *´¨)
 ¸.•´¸.•*´¨) ¸.•*¨)
 (¸.•´ (¸.•` ¤- By somesh....

अशीच नाती मी जपणार.....

अशीच नाती मी जपणार.....

काही असतात अशा आठवणी, ज्या मनात वसुनी राहतात,
कोण कुठली माणसे काही, आपलीशी मग वाटतात,
असेच नाते माझे जुडले, होते जे अनोळखी,
वेगवेगळे जरी किनारे, पण ती लाट माणुसकीची . . .

असा वेगळा प्रवास झाला, त्या पैलतीरावर जावून थांबला,
भाषा वेगळी प्रांत हा भिन्न, कसे जमेल हा प्रश्न दाटला,
गाठ भेट ती अशी जाहली, नव मायेची फुंकर लाभली,
अनोळखी त्या नात्यामध्ये, वेगळीच मग गोडी वाढली . . .

लग्नाचा तो योग होता, कार्य असे तिथे घडत होते,
त्या क्षणांचा आनंद घेत, मन पाखरू होवून गात होते,
अशी पाखरे त्या फांदीवर, खेळ सुखाचा खेळत होते,
काय थोर नि काय लहान, प्रेमात सगळे गुंफले होते . . .

असा विरघळलो रंगात त्यांच्या, जसा मी हि एक पाखरू,
क्षणांत मने जिंकून घेईल, अशा गायीचं मी वासरू,
एक विनंती करतो देवा, असा हास्यरंग वसू दे,
तुटून सगळी दुखाची गाठ, एक प्रेम गाठ बसू दे . . .

असा क्षण हा जीवनात आला, जो कधी न मी विसरणार,
असाच फिरत प्रत्येक तीरावर नाती मी जोडणार . . . अशीच नाती मी जपणार . . .

तिच्या हृदयात कायमचे मलाच स्थान मिळावे . . .

तिच्या हृदयात कायमचे मलाच स्थान मिळावे . . . 

प्रेम कधी सांगून किंवा पाहून होते असे नाही,
ज्या हृदयाशी गाठ बसते, ते आपलेच असते असे नाही,
ती आपली होणारच नाही, ह्या भीतीचे वादळ मनात फिरतच असते,
तिच्या सहवासातून दूर निघून जावे कि नाही तिथेच मन फसते . . .

जेव्हा विचार मनात तिचा येतो, तेव्हा मन बावरून जाते,
येईल का माझ्या मागे ती कधी, हे सतत मन वळून पाहते,
पण मनाला दिलासा देण्यासाठी, फक्त तिची आठवणच असते,
काय होईल प्रेमाचे माझ्या, कारण ओठांत आणि मनात तीच असते . . .

कधी कधी वाटते, तिला मनातले सगळे सांगून टाकावे,
असलेले प्रेम माझे, जणू तिच्या हृदयात ओतून पहावे,
जर होकार मिळाला, तर हृदयाला होणारा त्रास तितकाच असेल,
आणि नकार असेल, तर हृदय माझे तिथेच जळावे . . .

का असे प्रेम होते, ज्याला सगळीकडून बंधनेच असतात,
दमट, कोरड्या हवेमध्ये, ढग जसे दाटतात,
जरी नाही मिळाली मला साथ तिची, पण तिला मात्र माझे प्रेम कळावे,
एक बंधनरुपी मुर्तीम्हणून, तिच्या हृदयात कायमचे मलाच स्थान मिळावे . . . 

माझी प्रिये फक्‍त माझीच असावी.

माझी प्रिये फक्‍त माझीच असावी.

अशी असावी ती,
दीसलोका मी
हलकेच लाजावी ती,
नंतर मग एक मस्‍त
झकास स्‍माईल द्यावी ती.

मित्रानसमोर मला
दुरुनच बघावी ती,
एकांतात मात्र
माझ्या मिठीत निजावी ती.

वारंवार फोन करुन माझी
जेवनाची काळजी तीने घ्‍यावी,
आणि उशीरा का जेवला
म्‍हणून रुसुन बसावी.

गर्दीत तीची नजर
फक्‍त मलाच शोधावी,
आणि मी दीसल्‍यावर
चेह-याचे टेंशन विसरुण माझ्यासंग हींडावी.

कुठे बाहेर गावी गेल्‍यावर
मला तीची फार आठवण यावी,
आणि तीकडून आल्‍यावर
सादा एक फोनही केला नाही
म्‍हणून रागवावी.

माझ्यावर जास्‍तवेळ
तीचा राग नसावा,
Sorry म्‍हटल्‍यानंतर
पुढच्‍याचक्षणी तीचा हात
माझ्या हातात असावा.

मला फक्‍त
तीचीच ओढ असावी,
आणि तीही फक्‍त
माझ्यासाठीच  सजावी.

संकटाच्‍या वेळी
धावून येणारी ती असावी.
माझी प्रिये फक्‍त माझीच असावी.
माझी प्रिये फक्‍त माझीच असावी.

प्रत्यक क्षण मनात आठवणीत राहील....

प्रत्यक क्षण मनात आठवणीत राहील....

तुझ्या सोबतचा प्रत्यक क्षण मनात आठवणीत राहील
 दिलासा देणारं तुज बोलना माझ्या मनाला नेहमीच हसवत राहील

तुझ्या चेहऱ्यावरची खळी नेहमीच मनात घोर करून राहील
 तुझ्यासवे धुंडाळालेली प्रत्यक पायवाट जणू कोमल स्पर्श करत राहील

कडू -गोड आठवणीत एक निखळ नातं असच उमलत राहील
 रुसवे-फुगवे असतील काही तरी तुझ्याच मिठीत विसावत राहील

नकळत उमटलेले क्षण आयुष्याच्या पुस्तकात बंधिस्त राहील
 तेच पुस्तक आपल्या नाराज मनाला निहाळत राहील"

माझं प्रेम अधुरं राहीलेलं....

माझं प्रेम अधुरं राहीलेलं....


पहीलं पहीलं प्रेम
अचानक नकळत झालेलं
सगळ्यानपासुन लपवलेलं
तरी सुधा
 सगळ्यांना कळलेलं

पहीलं पहीलं प्रेम
पहील्यांदा अनुभवलेलं
मी तीला आणी तीने मला
प्रेम करायला शीकवलेलं
तरी सुधा
 शीकायचे काहीतरी
बाकी राहीलेलं

पहीलं पहीलं प्रेम
थोडसं निराश झालेलं
घरी कळाले तर काय
म्हणून थोडं घाबरलेलं
तरी सुधा
न घाबरता खरं
प्रेम नीभावलेलं

पहीले पहीले प्रेम
थोडक्यातच संपलेलं
तीच्या अचानक जाण्याने
दुखावलेलं
तरी सुधा
अजुनही तीच्याच
आठवणीत रमलेलं

असच काहीसं होतं
माझं प्रेम अधुरं राहीलेलं....

ती किती वेडी आहे.....

ती किती वेडी आहे,

ती किती वेडी आहे,

ती किती वेडी आहे,
एवढी शी गोष्ट तिला समजली नाही

मी किती वेडा आहे,
मला एवशी शी गोष्ट सांगता आली नाही

ती किती वेडी आहे,
डोळ्यातल्या भावना तिला काळात नाही

मी किती वेडा आहे,
तिच्या डोळ्यातच पाहत नाही

ती किती वेडी आहे,
प्रत्येक गोष्ट निरखून पाहते

मी किती वेडा आहे,
प्रत्येक गोष्टीत तिला पाहतो

ती किती वेडी आहे,
प्रत्येक गोष्टीवर रगवते

मी किती वेडा आहे,
मला तीच रागवन् ही आवडत

ती किती वेडी आहे,
उद्या तीच लग्न आहे

मी किती वेडा आहे,
तिच्या लग्नाची तयारी करतोय .....

भेट प्रेमाची पहिली...

भेट प्रेमाची पहिली...

सुर्यास्ताची वेळ ती ,
जशी रमणीय संध्याकाळ होती
अलगद हातात हात देत तू ,
कवेत माझ्या येत होती...

                                 मंद वा-याचा स्पर्श तो ,
                                 जवळीक साधुनी जात होता
                                 बिलगताच मजला तू ,
                                 अंगावरी शहारे तो आणीत होता...

निशब्द झालेले मन ते ,
शब्दरूपी आता होत होते
इवलेसे हृदय माझे ते ,
तारुण्यात आता येत होते...

                                  मखमली तारुण्याला त्या ,
                                  मनी प्रकाशाची भीती होती
                                  अन लाजणा-या लोचनांना ,
                                  आज अंधाराची आस होती...

कुठे फरक पडला आहे

कुठे फरक  पडला आहे….

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दाद्ागिरी करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती....

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती....

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती......

हा भास तुझा होताना……..

हा भास तुझा होताना……..

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना……..

अशी असावी माझी प्रेयसी.

♥♥♥ ... अशी असावी माझी प्रेयसी... ♥♥♥
थोडी लाजरी,
गोड हसरी,
नव्या गंधाने,
नव्या रंगाने,
कोमल कळीसारखी,
आयुष्य उमलवणारी...!!!
डोळ्यामध्ये तिच्या,
असावा तो ओलावा,
प्रेमामध्ये जीच्या,
मला चिंब भिजवीणारा...!!!
स्वर्गीय असावा,
सहवास तिचा असा,
की कधीही न संपणारा;
मला तिच्यात नि तिला माझ्यात,
बेधुंदिने सदैव गुंतून ठेवणारा...!!!

तुझ्या हाताचा स्पर्श होता..

तुझ्या हाताचा स्पर्श होता..

उजवीकडे तारीख..
मग मायना..
नंतर मजकूर..
बुद्धीबळातल्या उंटासारखा
तिरका वाकडा धावणारा..

तसं बर चाललय आयुष्य
असं पानभर सांगणारा..
खाली डावीकडे लिहिलेलं
कळावे.. लोभ असावा..
तळटीप.. ता.क. उगाच..
काहिसं निरर्थक.. पण
पत्राचा स्कूल पैटर्न पूर्ण करणारं..

आज ती सारी पत्र..
कपाटातून बाहेर सांडली..
आणि.. समजलं
त्या निरर्थक भावनेलाही
किती अर्थ होता..
त्या पत्राला सखे,
तुझ्या हाताचा स्पर्श होता..

आज सातासमुद्रापलिकडून
रोज येतात तुझी फ़ॉर्वर्डेड ई मेल्स
पण.. त्यात.. तू कुठे ग दिसतेस..

ह्याला विज्ञानाचा
शाप म्हणावं की वरदान..
संभ्रमात मी आहे थोडी..
निर्णय पक्का झाला की..
मीही तुला ईमेलच करणार आहे..

Monday, 28 May 2012

प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर

"प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?"

घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
"प्रेम करतो तुझ्यावर, तू करशील माझ्यावर?"

तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं.
ढग नाही बरसले तेंव्हा
वारा नाही सुटला तेंव्हा
मोरही नाही दिसला नाचताना
एक कावळा तेवढा ओरडला
त्याला मात्र सतारीच्या झंकाराचा भास झाला.

अविश्वासानं त्यानं थरथरत
तिचा हात हातात घेतला
छाती फाटेस्तोवर एक भला मोठा
मोकळा मोकळा श्वास घेतला
चंद्र नाही हसला तेंव्हा
मोगरा नाही फुलला तेंव्हा
गाणंही नाही सुचलं गुण्गुणावं म्हणताना
एक स्कूटरवाला तेवढा शीवी हासडून गेला
त्याला मात्र सनईच्या ओल्या सुरांचा भास झाला.

मग पुढं लग्न-बिग्न, पोरं-बिरं
संसार-बिंव्सार करून झालं
चिमणा चिमणीचं एकच पाखरू
दूर विदेशात उडून गेलं
एके दिवशी घाबरत घाबरत शब्द जुळवत
त्याने तिला एकदाचे विचारलं
"जमलं का गं मला, तुला सगळी सुखं द्यायला?"
तिनं त्याच्याकडे हसून पाहीलं
त्याला क्षणात ब्रम्हांड आठवलं
मग हळूच तिनं त्याला
डोळ्यांतूनच हो म्हणलं.....

माणुसकीला जपशील .....

माणुसकीला जपशील

खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना |
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना ||
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस |
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस ||

म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस? |
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस? ||
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस |
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस ||

असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस ||
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा ||
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो |

Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो ||
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील |
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील ||
तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.


पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर

ते ओठ तेव्हा माझे नसतील...

ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

मी तर म्हणतो .....

मी तर म्हणतो .....

सर तुम्हीच सांगितले होते ना,
जा आणि तिच्या कडून notes घे…..

शिकवले नाही तर काय झाले?
notes वाचून परीक्षा दे…..

म्हणून गेलो, नी खड्ड्यात पडलो
कणा मोडला पण प्रेमात पडलो….

तिला फक्त ‘देतेस का?’ विचारले….
माहीत नाही ,
तिच्यावर का आभाळ कोसळले?….

notes एवजी तिने frdship
असा अर्थ घेतला….

(नी पुढे बोलायाच्या आतच )
एक धक्का जोरात दिला…..

पडलो एकदाचा खड्ड्यात,
आणि मोडला माझा कणा….

पण काहीही असो सर,
परत एकदा लढ म्हणा….

मी तर म्हणतो सर,
तुम्ही कधी शिकउच नका…

notes ‘परत आण’ म्हणायला,
जराही कचकू नका….

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी...

अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी...

एकदा डोळ्यातल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,
कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............

दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,
रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,
सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,
आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,

उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,
भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पन्दनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुलेच आज हे जग आहे.
अशीच आपली कहाणी.........

ऐकून ही अश्रुची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी............ ....

मी मनापासुन प़ेम केल होत -

मी मनापासुन प़ेम केल होत -


आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत -

पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत -

एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत -

दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत -

हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
आयुष्यात - - प़ेम केल होत -

नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत
आयुष्यात - - प़ेम केल होत -

इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

प्रेम प्रेम अन् प्रेमच…….

गाईचे वासरावरती असते ते प्रेम………
चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………
आईचे मुलांवर असते ते प्रेम………
नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………
अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..
प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,
पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..
आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…
खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!
तर….

खरे प्रेम असावे…..
कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….

खरे प्रेम असावे…..
गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….

खरे प्रेम असावे…..
आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..
कुठेही गेले तरी न संपणारे,
सदैव आपल्या बरोबर असणारे…..

खरे प्रेम असावे…..
पैशाने विकत न घेता येण्यासारखे,
वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……

कारण…..

प्रेम हा काही खेळ नाही,
टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..

मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे......

मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे......

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे

“….चिंब भिजलेलं पत्र….”

“….चिंब भिजलेलं पत्र….”


आली पावसाची सर
धावत पडली झरझर
भिजल्या पाकिटातून पत्र
डोकावू लागलं वर

चिंब चिंब भिजलं
अगदी शब्द ओघळेपर्यंत
तरी थोडं उरलं पुसटसं
आठवणी जुळवेपर्यंत

समोर बसून तिनं ते
लिहिलं होतं तिच्या हातानं
चार घड्या पडल्या तरी
जवळ असायचं तिच्या रुपानं

ओघळली सगळी शाई
गेली त्या सरीत वाहून
आत्ता कशी आठवण काढू
आणि कोणाकडे पाहून..??

तसचं ते पाकिटात ठेवीन
कितीही घड्या पडल्या तरी
झाला जरी कागद कोरा
त्यातच माझी स्वप्नातील परी


नशीबवान तर सगळेच असतात...

नशीबवान तर सगळेच असतात...

नशीबवान तर सगळेच असतात
नशीबाला बदलणारा एखादाच असतो

हसतमुख तर सगळेच असतात
दुसर्याला हसवणारा एखादाच असतो

मर्त्य तर सगळेच असतात
कर्तुत्ववान अमर एखादाच असतो

चमकणारे कजवे बरेच असतात
प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो

सुखचे सोबती सर्वच असतात
दुःखचा साथीदार एखादाच असतो....

'नडला तर फोडला'....

'नडला तर फोडला'....

माता ज्याची थोर जिजाऊ
शहाजी ज्याचे पिता
तो लढला ज्यासाठी जन्मभर
ती होती मराठी अस्मिता
हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी
तो संतापून पेटून उठला
जो किल्ला त्याने चढला
तेथे भगवा नेहमीच फडफडला
तरुणांच्या हाती देऊनी समशेर
घडविला त्याने मावळा
स्वराज्यासाठी त्या शूरविरांनी
सोसल्या लाखो कळा
धोक्यात आहे आज पुन्हा मराठी
काढूनी टाका सुरांतून नाराजी
उठा अन् शोधा स्वता:तच
तोच मावळा तोच शिवाजी
******जय महाराष्ट्र*********
'नडला तर फोडला' महाराष्ट्रासाठी तडजोड़ नाही

आठवले की डोळ्यात चटकन् पाणि येतं………….

आठवले की डोळ्यात चटकन् पाणि येतं………….

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्यानेLibrary कडे
पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण
आठवले की डोळ्यात चटकन् पाणि येतं………….

मी गेल्यानंतर काय हवे.....

 मी गेल्यानंतर काय हवे.....


स्वप्न माझे, मी गेल्यानंतर काय हवे
मला हवे ते तुला आज जे हवे हवे….
चिअर्स करूनी रडणारा तो ग्लास हवा
घाटावरती घोटामधले प्राण हवे….!!

मेल्यानंतर हिशोब करणे शक्य असे
जगताना गणिताचे केवळ भय असे
बघतो मी आले गेले कोण कोण ते
मला आता इथे कुणाचे भय नसे….

मेल्यानंतर खोटे खोटे रडले कोण
दिसतील मजला मित्रच माझे.. दुसरे कोण ?
हाय गेला रे…. पांड्या आता उडुनी गेला
गुत्त्यामधले पैसे आता देइल कोण ?

मेल्यानंतर माझ्या सौ रडतील आता
आठवण येइल तिला माझी येता जाता
करेल काय पण सांगेल कुणाला…
भांडायाला हक्काचा मी निघुन जाता..!!

मेल्यानंतर कळेल मला जगणे सारे
हातामधे येतील माझ्या चंद्र नी तारे
अरे सख्या रे उशीर झाला कळता कळता
बदलून गेल्या दिशाही सगळ्या वळले वारे….

मी गेल्यानंतर काय हवे.....

 मी गेल्यानंतर काय हवे.....

स्वप्न माझे, मी गेल्यानंतर काय हवे
मला हवे ते तुला आज जे हवे हवे….
चिअर्स करूनी रडणारा तो ग्लास हवा
घाटावरती घोटामधले प्राण हवे….!!

मेल्यानंतर हिशोब करणे शक्य असे
जगताना गणिताचे केवळ भय असे
बघतो मी आले गेले कोण कोण ते
मला आता इथे कुणाचे भय नसे….

मेल्यानंतर खोटे खोटे रडले कोण
दिसतील मजला मित्रच माझे.. दुसरे कोण ?
हाय गेला रे…. पांड्या आता उडुनी गेला
गुत्त्यामधले पैसे आता देइल कोण ?

मेल्यानंतर माझ्या सौ रडतील आता
आठवण येइल तिला माझी येता जाता
करेल काय पण सांगेल कुणाला…
भांडायाला हक्काचा मी निघुन जाता..!!

मेल्यानंतर कळेल मला जगणे सारे
हातामधे येतील माझ्या चंद्र नी तारे
अरे सख्या रे उशीर झाला कळता कळता
बदलून गेल्या दिशाही सगळ्या वळले वारे….

फुले शिकवतात......

फुले शिकवतात......

गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं......

फ़क्त मैत्री

फ़क्त मैत्री

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री


जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री..........

एकदा एक मुलगी...

हसु नका !

एकदा एक मुलगी रक्शाबंधनच्या दिवशी राखी घेउन आली...
मि College कट्टयावर बसलो होतो,
ति माझ्याकडे आली आणि मला म्हणाली हात पुढॆ कर, मला राखीबांधायची आहे तुला ,
मी म्हणालो मुळीच नाही.
ति म्हणाली काय झालं ? काय झालं ? काय Problem आहे ?
मी म्हणालो वा! ग वा! शहाणीच आहेस की, उद्या मी मगंळसुञ आणतो, तु घेशील का बांधुन ?
ती काही न बोलता, सरळ गप्प निघुन गेली

एक मैत्री अशी हवी ........

एक मैत्री अशी हवी ........

पाहता क्षणी मन भरून यावे.......
एक मैत्री अशी हवी ........

मन तिच्याच भोवती सतत
रुंजी घलाव.........

एक मैत्री अशी हवी ........
मनातल्या गोष्टी तिला संगीतल्याशिवाय

मन हलके न व्हावे
एक मैत्री अशी हवी ........

अवगुनाकडे हक्काने बोट दखावानारी
आणि आदराने चूका कबूल करणारी

एक मैत्री अशी हवी ........
प्रेमाचा स्पर्श असलेली

प्रेमाने चेहर्यावर
हस्याची कारंजी फुलावनारी

एक मैत्री अशी हवी ........
विश्वसाने विश्वास सम्पादुन

मैत्रिच्या नात्याला एकरूप करणारी
एक मैत्री अशी हवी ........

भविष्यत
कितीही नाती जोडली गेली
तरी मैत्री या नत्याला अंतर न
देणारी ......

कधी असेही जगून बघा…..

कधी असेही जगून बघा…..

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारख

आठवण.....

आठवण.....
.
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल

माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल

कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

कधी कधी अदिती...

कधी कधी अदिती...

कभी कभी अदिति चे मराठी रूपांतर

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अशात कुणी कसे रोखावे आसवांचे झोके
अन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..

कधी कधी वाटतं, जगण्यात नाही उरली काहीच मजा
कधी कधी वाटतं, दिवसातला प्रत्येक क्षण एक सजा
अशा हदयात कसे पडावे हास्याचे ठोके
अन कसे कुणी म्हणावे , Everythings gonna be ok ..

करतात बघ तुजवर किती प्रेम सगळे
रडतो आम्हीही जर तुझे आसू वाहिले
गाणं येत नाही तरी आम्ही गाऊन पाहिले
अदिती , मानलं जग कधी अंधारलेलं वाटतं
पण रात्रीनंतरच नाही का हे आभाळ उजाडतं

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं
अदिती , हस ना हस ना हस ना हस ना हस ना तू अता
नाही तर बन ना थोडी थोडी थोडी थोडी थोडीश्शी स्मिता

तू खुश आहेस तर बघ जग सुंदर दिसतं
सूर्य ढगातून येउन जगात जगणं पसरवतो
ऐक बेभान वारा तुला येउन काय सांगतो
की अदिती, दूर गेलेले परत एकदा भेटतात
अदिती तू बघ , ही फ़ुलं नक्की परत फ़ुलतात

कधी कधी अदिती,जगताना कुणी आपलं वाटतं
कधी कधी अदिती,तो गेल्यावर एक ते स्वप्न वाटतं

मैत्री : एक शोध

मैत्री : एक शोध

जेंव्हा जीवाचं शिवाला
रंकाचं रावाला
भक्ताचं देवाला
न सांगताही कळलं जातं
तेंव्हाच आपोआप
मैत्रीचं नातं जुळलं जातं

मैत्री मैत्री असते
मैत्री जन्मदात्री असते
मैत्री म्हणजे खात्री असते
मैत्री म्हणजे पत्रापत्री असते
मैत्री म्हणजे
कधी तीची,कधी त्याची
भर पावसात,
उन्हाळ्याच्या दिवसात
दोघांत
फक्त एकच छत्री असते

मैत्री म्हणजे लुकलुकणारं चांदणं
मैत्री म्हणजे हातावरचं गोंदणं
मैत्री म्हणजे मना-मनातल्या
तणाचं वेळोवेळी निंदणं
मैत्री म्हणजे
एकमेकांच्या कुशीत स्फुंदनं

मैत्री रडवते
मैत्री हसवते
मैत्री सांगुन फसवते
मैत्री मना-मनात नवा स्वर्ग वसवते

मैत्री विहिरीतला पारवा
मैत्री रानातला सरवा
मैत्री उन्हातला गारवा
मैत्री मिसळीतला झणझणीत शरवा

राधेचा संग असते मैत्री
मीरेचा रंग असते मैत्री
द्रौपदीचे न उलगडलेले
गुढ अंग असते मैत्री
सुदाम्याच्या किड्क्या पोह्या्त
कधी गुंग असते मैत्री
कधी कर्ण दुर्योधनाच्या
प्रेमात दंग असते मैत्री

मैत्री क्षणभर टेकायला हक्काचं स्थळ देते
मैत्री लागेल एवढी कळ देते
मैत्री जगायला आभाळाएवढं बळ देते !


जगण्यासाठी अजुन काय हवं

जगण्यासाठी अजुन काय हवं

एक आई, एक बाप,
एक भाऊ, एक बहिण,
असं एखादं घर हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक मित्र, एक शत्रु,
एक सुख, एक दु़:ख,
असं साधं जीवन
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,
एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,
यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक सुर्य, एक चंद्र,
एक दिवस, एक रात्र,
फक्त सगळं समजायला हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक शक्ती, एक भक्ती,
एक सुड, एक आसक्ती
ठायी असेल युक्ती तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

थोडा पैसा, थोडी हाव,
थोडा थाट, थोडाबडेजाव,
सगळयांच्या तोडी आपलंच नाव,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक नोकरी, एक छोकरी,
दोन मुलं अन खायला भाकरी,
उत्तम प्रकारची जर असेल चाकरी,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक समुद्र, एक नदी,
एक शांत, एक अवखळ
जीवनात असली जर एक तळमळ
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक इच्छा, एक आशा,
एक मागणं, अक अभिलाषा,
मनात भरलेली सदा नशा,
जगण्यासाठी अजुन काय हवं

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास

कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास

आठवण आली तुझी की.

आठवण आली तुझी की,

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..

मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासाविस होतं

मग त्याच आठवणीना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं

अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य…
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य…

पण तरिही………

आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी….

नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी….

कोणीतरी असाव....

कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर...
फक्त दोन अश्रु ढ़ाळणार कोणीतरी असाव...
सांत्वन नाही केल जरी कोणी ...
तरी त्याच ते दुख: खर असाव...

उद्या मी मेल्यावर...
सगळ इथेच असणार आहे...
पण माझ्या फोटो कड़े पाहून...
ओठावर हसू आणि डोळ्यात वेदना ठेवणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
विसरले जरी सगले तरीही....
माझी आठवण ठेवून श्वास घेणार कोणीतरी असाव....

उद्या मी मेल्यावर
माझ्या आठवणीत जागुन रात्र काढणार...
माझ्या फक्त माझ्या कुशीत शिरण्यासाठी तळमळणार कुणीतरी असाव...

वाढदिवसांची वाढ

वाढदिवसांची वाढ

वाढदिवस साजरे केल्याशिवाय
जणु नेते, नेते वाटत नाहीत.
बारशापासून शताब्दीपर्यंत
कुठलेच महोत्सव सुटत नाहीत.

नेत्यांच्या वाढदिवसाला
कार्यकर्त्यांचेच थाट असतात.
लेकराबाळांचे नसले तरी
नेत्यांचे वाढदिवस पाठ असतात.

अमके दान, तमके दान,
कार्यक्रमांची दाणादान असते.
पक्षीय मतभेद विसरल्याची
ऍक्टींग पण फार छान असते.

नेत्यांचे वाढदिवस,
नेत्यांना लखलाभ होवोत !
" तुम जिओ हजारों साल "
पण जनतेच्या नशिबी,
सुखाचे चार दिवस येवोत !!

जय भवानी जय शिवाजी

"जय भवानी जय शिवाजी"

माझे अवघे मी पण हिंदू
आयुष्याचा कणकण हिंदू,
ह्रदयामधले स्पंदन हिंदू
तन-मन हिंदू, जीवन हिंदू !

धगधगणारी मशाल हिंदू
आकाशाहुन विशाल हिंदू,
सागरापरी अफाट हिंदू
हिमालयाहुन विराट हिंदू !

तलवारीचे पाते हिंदू
माणुसकीचे नाते हिंदू,
अन्यायावर प्रहार हिंदू
मानवतेचा विचार हिंदू !

महिला, बालक, जवान हिंदू
खेड्यामधला किसान हिंदू,
शहरांमधुनी फिरतो हिंदू
हरेक मस्जिद, मंदिर हिंदू !

झंझावाती वादळ हिंदू
हिंदू हिंदू केवळ हिंदू !

प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

 प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

तिला म्हणालो, मला आजकाल झोप येत नाही
काय करु , तुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली
झोपेची गोळी काढून,माझ्या हातावरती दिली.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो , माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली ,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे .
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.
...... काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो , तुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्याक्षणी ती उठली, आणि आत निघून गेली .
माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स" घेवून आली.
..... मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे.
अहो ! प्रेयसी माझी, एम .बी.बी.एस आहे.

आयुष्य.

आयुष्य.

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे
पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

अजुन काय हवे मला

अजुन काय हवे मला

एकच चहा, तो पण कटींग...
एकच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून

एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून....
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून

एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.

एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...
एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...
अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून...
स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन...
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन..
अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून

मैत्री कधी ठरवून होत नाही.

मैत्री कधी ठरवून होत नाही.

एक सांगू का... मैत्री कधी ठरवून होत नाही.
आपण आपल्या वाटेवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात
एकमेकात येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळ्त कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळ्ते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालू लागतो
नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो, सोबत करतो
एकमेकांची दु:खे वाटून घेतो
आनंदाचे क्षण साजरे करतो
मैत्री अशी होते
काय जादू असते मैत्रीत!
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळ्त असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगाचे, आकारांचे, प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा
खर्रा खुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का!
मोतीसुदधा लाभावा लागतो ....

आयुष्य खूप सुंदर आहे,


आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,

ती चालली होती


ती चालली होती, एकटीच एकटिच्या वाटेने.....
कुणाचीतरी सोबत मिळेल या वेडया आशेने......

तसा डोक्यावरचा सुर्य होताच तिच्या साथीला.....
जणु तो साथ देत होता तिच्या संथ गतीला.......

तिला भान न होते तिच्याही अस्तित्वाचे.........
चटकेही लागत नव्हते पाया खालच्या विस्तवाचे......

अचानक डोक्यावरचा सुर्य ढगाआड जाउ लागला.....
भर दिवसा हवेत मंद वारा वाहु लागला.....

तिच्या शांत चेहरयावर हसु उमटले......
गुढ प्रकृतीचे जणु फक्त तिलाच उमगले......

आतुर होऊन ती ढगाकडे पाहु लागली.......
पावसाच्या नुसत्या कल्पनेने ती प्रफ़ुल्लीत होऊ लागली.....

तिला वाटल पावसाच्या आगणित सरी तिच्यावर कोसळणार.....
अन.. मतीचा सुगंध तिच्या श्वासात मिसळनार......

पन....तो मात्र तिला नुसतीच आशा दाखऊन परतला.....
ढगाआड लपलेला सुर्य गालतल्या गालत हसला......

डोळयातुन तिच्या पाण्याचे अनेक थेंब ओघळले.......
त्या थेंबा मुळे जनु सारे आसमंत उजळले....

ती शुन्य नजरेने तिच्या वाटेकडे पाहु लागली.......
थकलेली पाऊले पुन्हा ऊचलु लागली.... अन...ति पुन्हा एकटिच चालु लागली........ !!!!!



प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम करणं सोपं नसतं

सर्व करतात, म्हणून करायच नसतं
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
शाळा कॉलेजांत असच घडतं
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं
 

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल....


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू  मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...


कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...


कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...
--
तुलाच शोधतोय!
तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी.....

बाकी काही नाही कुणीतरी आठवणं काढतय,......

 बाकी काही नाही "कुणीतरी आठवणं काढतय,......


हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......


रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही


कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......


मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल...............
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल...........
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल.............. बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही


कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......


जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

 बाकी काही नाही "कुणीतरी आठवणं काढतय,......




मी स्वतःला कधी ओळखूच शकलो नाही

खरंच! मी स्वतःला कधी ओळखूच शकलो नाही
आता असं वाटतं, की मी स्वतःलाच समजून घेऊ शकलो नाही....
मिटलेल्या पापण्यांवरची ओली स्वप्नं, कधी वेचुन घेऊ शकलो नाही....

फुलपाखरामागे वेडावून धावताना,
फुलांचे रंग जाणूच शकलो नाही....

भावनेच्या बंधात गुरफटून जाताना,
नात्यांचे स्पंद जपूच शकलो नाही....

माझ्या श्वासांची किंमत केलीच नाही कधी कुणी,
आणि माझे निश्वास मी कधी रोखूच शकलो नाही....

माझ्या फुटकळ आसवांना डोळ्यांत सजवताना,
वेदनेला माझ्या मी थोपवूच शकलो नाही....

मृत्यूवरही माझ्या, रडणारे आहेत मोजकेच,
चार हक्काचे जिवलग, मी कधी जमवूच शकलो नाही....

खरंच! मी स्वतःला कधी ओळखूच शकलो नाही

स्वप्न आणि सत्य

स्वप्न आणि सत्य
एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार भांडण झाले. विषय होता भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा ? दोघे ही खुप भांडले, झगडले पण निर्णय काही होईना. शेवटी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ते आपल्या मानसपित्याकडे- ब्र्म्हदेवाकडे गेले. ब्र्म्हदेवाने त्यांना सांगितले, "ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील आणि तरीही ज्याचे पाय जमिनीवर आसतील, त्याचा भविष्या घडविण्यात निर्णायक सहभाग असतो". दोघेही परत आले. स्वप्नाने आधी प्रयत्न केला. एकच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले, पण त्याचे पाय जमिनीपसुन केंव्हाच उचलले गेले होते. सत्याने नंतर प्रयत्न केला. त्याचे पाय कायम जमिनीवर होते, पण त्याचे हात आभाळापर्यंत कधीच पोचु शकले नाहीत. दोघांनीही खुप प्रयत्न केले, पण दोघांपैकी कोणीच यशस्वी होउ शकले नाही. थकुन परत एकदा ते ब्रम्हदेवाकडे गेले, आणि या वेळेस ब्रम्हदेवाने त्यांना सांगितले, "भविष्य घडविण्यात सत्य, आणि स्वप्न या दोघांचाही सहभाग तितकाच मोलाचा असतो. खर्‍या अर्थाने यशस्वी भविष्य घडवायचे असेल, तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे रहयला हवे

प्रवास मैत्रीचा.........

प्रवास मैत्रीचा.........
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा...

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा....

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास....
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास

जीवनात नाती तशी अनेकच असतात


जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......
 काही नाती असतात रक्ताची, तर काही हृदयाची......
काही नाती असतात जन्मो-जन्मीची, तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......
काही नाती असतात, केसांसारखी न तुटणारी, पण वेळ आलीच तर वाकणारी.....
काही नाती असतात, लांबुनच आपले म्हनणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....
काही नाती असतात, पैशाने विकत घेता येणारी, तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......
काही नाती असतात, न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी......
 जीवनात नाती तशी अनेकच असतात....
म्हणुनच म्हणतात ना." हे जीवन एक रहस्य आहे, तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं...........
सवय...आहे...
तुझी वाट पहाण्याची...
तू येणार नसतानाही...

सवय... आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची...
तू ऐकत नसतानाही....

सवय... आहे...
तुला पहात बसण्याची..
तू समोर नसतानाही..

सवय...आहे...
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची...
तो येणार नसतानाही....

सवय...आहे...
मन मारून झोपण्याची....
झोप येणार नसतानाही...

सवय...आहे...
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची..
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसतानाही...............

आहे बरेच काही सांगायला मला........



आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला....!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला....?

का रात्र मी अमेची जागून काढली...?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला...?

जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय.....


जे अशक्य वाटतय                                                                               
ते स्वप्न मला पहाचय.....

ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही      
त्याला मला हरवाचय..

कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..

ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..
ज्या वेळी माझे भाऊ थकलेत
पाय थकलेत,हात थकलेत,शरीर थकलय...

त्या वेळेस मला
समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकाचय..

तो " स्टार " मला गाठाचाय मला " सत्यासाठी " झगडाचय सर्घष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही
थांबा घ्यायचा नाही...

माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण
त्याला कारण " स्वर्गीय " असल पाहिजे...
                                                                      

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...